हवा आधाराचा, संवादाचा पूल! 

हवा आधाराचा, संवादाचा पूल! 

पुणे - हाडं झिजायला आली, की आपुलकी आणि मायेची जास्तच गरज असते. पण, एकेकाळी ज्यांच्यावर माया केली, तीच लोकं दुरावतात आणि म्हातारपणी एकाकीपणाला सामोरे जावे लागते. असेही मरण व्हावे, की आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही आपल्या सोबत कुणीही नसावे... असे दुर्दैव अनेक ज्येष्ठांच्या नशिबी येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या संध्याकाळी एकटेपणाशी झगडावे लागू नये, यासाठी "सकाळ'ने उपाय सुचविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यापैकी काही निवडक सूचना देत आहोत. 

ई-मेलवर आलेल्या प्रतिक्रिया 
शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत सीनिअर सिटिझन हेल्प सेंटर असावे. "सीएसआर'च्या माध्यमातून म्हणून अशी केंद्रे चालविण्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घ्यावी. 
- डॉ. टी. टी. पाटील 

ज्येष्ठ नागरिकांच्या साह्यासाठी वेब पोर्टल सुरू करावे. 
- अशोक आंबेकर 

ज्येष्ठांसाठी खास वेगळे वसतिगृह असावे. 
- स्नेहल शिंदे 

नोकरीनिमित्त शहरात आलेल्या जोडप्यांना वडीलधाऱ्यांचा आधार नाही. अशा एकमेकांना पूरक लोकांना एकत्र आणल्यास आणि व्यवस्थित परिचर पडताळणी केल्यास त्यांना एकत्र राहण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. 
- धनंजय पाठक 

एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची एक "सिटी' वसविता येईल. ज्येष्ठ नागरिक करू शकतील, असे काम दिल्यास त्यांचेही मन रमेल. 
- प्रशांत पितालिया, आदित्य नाकोडा 

फेसबुकवरील प्रतिक्रिया 
रिक्रिएशन आणि हेल्थ सेंटर तयार करावे 
- सुधीर कुलकर्णी 

ज्येष्ठांच्या घरी जाऊन गप्पा मारण्यासाठी वेळ देणारे समाजसेवक असायला हवे. 
- उदय नागनाथ 

घरात "पेईंग गेस्ट' ठेवा. वयस्कर लोकांची करमणूकही होईल आणि घरापासून लांब राहणाऱ्या तरुणांनाही घर मिळेल. 
- विनय मंत्री 

ट्‌विटरवरील प्रतिक्रिया 
गरीब विद्यार्थी खेडेगावातून शिक्षणासाठी शहरात येऊ इच्छितात. त्यांची राहण्याची सोय ज्येष्ठ नागरिकांकडे करावी आणि त्या विद्यार्थ्याने त्यांची काळजी घ्यावी, अशा विद्यार्थ्याची हमी स्वयंसेवी संस्थांनी घ्यावी. 
- मनीषा देशमुख 

ज्येष्ठांची होणारी हेळसांड पाहता आरोग्य, वस्त्र, निवारा आदी गोष्टी मोफत द्याव्या. हा प्रश्‍न फक्त पुण्यापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्रभर अभियान राबवावे. 
- कांचननंदा निगडे 

अवाढव्य वाढणाऱ्या पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना एकलकोंडेपणा येऊ नये, यासाठी आपणही काय सुचवाल? आम्हाला कळवा webeditor@esakal.com वर. सूचनांसाठी ट्‌विट करा किंवा फेसबुकवर हॅशटॅग वापरा #PuneSrCitizen 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com