सुप्रिया सुळे उद्यापासून बारामतीच्या दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

बारामती - गावभेट दौऱ्यांतर्गत खासदार सुप्रिया सुळे येत्या गुरुवारी (ता. ५) आणि शुक्रवारी (ता. ६) बारामती तालुक्‍यात येणार आहेत. गुनवडी येथून गुरुवारी सकाळी त्यांच्या या  दोनदिवसीय दौऱ्याची सुरवात होणार आहे. त्या गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता गुनवडीत असतील. त्यानंतर मळद, मेखळी, घाडगेवाडी,  नीरावागज, खांडज, शिरवली, सांगवी, कांबळेश्वर, शिरष्णे, कुरणेवाडी, माळवाडी व लाटे असा दिवसभराचा दौरा असेल. 

ता. ६ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता सावंतवाडी येथून या दौऱ्याची सुरवात होणार असून या दौऱ्यात गोजुबावी, कटफळ, गाडीखेल, साबळेवाडी, शिर्सुफळ, सिद्धेश्वर निंबोडी, जैनकवाडी, वंजारवाडी, सावळ, कण्हेरी, काटेवाडी, पिंपळी व संध्याकाळी बांदलवाडी आदी गावांत त्या ग्रामस्थांशी संवाद साधणार  आहेत.

Web Title: Supriya Sule Baramati tour