असंवेदनशील सरकारकडून होणारी जाहिरातबाजी दुर्दैवी : सुळे (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

दौंड (जि. पुणे) : "पूरग्रस्तांना मदत करतानादेखील महाराष्ट्र सरकार जाहिरातबाजी करत आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठीच्या डब्यांवर स्टीकर लावले नाहीत,'' असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी भीमा नदीकाठच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला.

नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव असल्याने पूर परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. सांगलीत पाणी वाढत असतानाही यात्रा सुरू होत्या, अशी टीकाही सुळे यांनी यावेळी केली.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अंसेवदनशील मंत्री आहेत. आपण विरोधाला विरोध करीत नसून पूरग्रस्तांसाठी आपण सगळे मिळून काम करू, असेही खासदार सुळे यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षातर्फे डाॅक्टरांचे पथक पूरग्रस्त भागात रवाना झाले आहे. मी स्वत: पूरग्रस्त भागात राहून सेवा करणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule criticize state government on advertisement about flood victims help