बारामती-पुणे रेल्वेलाईन इलेक्ट्रीक मल्टिपल युनिट व्हावी; सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule demand Baramati-Pune Railway Electric Multiple Unit
Supriya Sule demand Baramati-Pune Railway Electric Multiple Unit

बारामती- रेल्वेने प्रवास करणा-या बारामतीकरांची सोय व्हावी या साठी बारामती ते पुणे मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट (मेमू) रेल्वे सुरु करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी काल रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांच्याकडे केली. सुळे यांचे समन्वयक प्रवीण शिंदे हेही या प्रसंगी उपस्थित होते. 

दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे यांनी विनोदकुमार यादव यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी यादव यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे, बारामती पुणे बारामती प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांकडून सातत्याने मेमू रेल्वेची मागणी होते आहे. या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. मेमू रेल्वेमुळे वेळेचीच बचत होणार नाही तर प्रदूषणही रोखण्यास याची मदत होईल. पुणे दौंड बारामती या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होऊन कालावधी उलटून गेला आहे, मेमूसाठी सर्व मुलभूत सुविधा असतानाही मेमू सुरु होत नाही. 

बारामती रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या जागेमध्ये रस्त्याचे विस्तारीकरण करण्यासह सेवा रस्त्यास परवानगी मिळावी, अशीही मागणी त्यांनी केली. नीरा रेल्वे स्थानकाची इमारत जुनी व जीर्ण झाली असून ती पाडून तेथे नवीन इमारत उभी करावी, दौंड रेल्वे स्थानकाचे कामकाज सध्या सोलापूर विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीत असून सोलापूर ऐवजी हे स्थानक पुणे विभागीय कार्यालयाला जोडावे अशीही मागणी सुळे यांनी केली आहे. 

जेजुरी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे तसेच प्लॅटफॉर्म, प्रसाधनगृह, स्कायवॉक, प्रतिक्षालय या सारखी कामे पूर्ण झालेली असून त्याच्या उदघाटनासाठी वेळ द्यावा अशीही मागणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com