बारामतीसाठी सुप्रिया सुळेंकडून 12 कोटींच्या निधीची मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी आणि वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे 12 कोटी रुपयांची मागणी केली.
Supriya Sule
Supriya SuleSakal

बारामती - बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha Constituency) मुळशी आणि वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारकडे (State Government) 12 कोटी रुपयांची मागणी केली. (Supriya Sulen Demands Rupees 12 Crore for Baramati)

बारामती लोकसभा मतदारसंघातील उर्जा विभागाच्या विविध प्रश्नांविषयी राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या दालनामध्ये गुरुवारी (ता. 3) बैठक झाली. या बैठकीत मुळशी व वेल्हे या तालुक्यातील वाड्या-वस्त्यांसाठी 12 कोटी रुपयांच्या निधीची आग्रही मागणी सुळे यांनी केली.

Supriya Sule
पुणे : गुन्हेगार दवाखान्यातून फरार; पोलिसांना हलगर्जीपणा नडला

रहाटणी ते वरसगाव सब स्टेशनला आणखी एक विद्युत वाहिनी द्यावी तसेच भाटघर येथील 132 केव्ही सब स्टेशनच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, असेही त्या म्हणाल्या. पुरंदर आणि बारामती तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला तत्काळ मंजुरी मिळावी हा मुद्दा देखील या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

बारामती, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, इंदापूर, हवेली हे तालुके आणि खडकवासला विधानसभा मतदार संघात एकूण 22 ठिकाणी नवीन सब स्टेशन उभारणी साठी मंजुरी मिळावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यावेळी उर्जा विभागाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल व बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे उपस्थित होते.

Supriya Sule
भारतीयांची कमाल; आकाशगंगेतील हायड्रोजनचं मोजलं वस्तुमान

याठिकाणी हवेत सबस्टेशन -

बारामती तालुका सबस्टेशन

  • मूढाळे - 220 केव्ही

  • करंजे – 33x11 केव्ही

  • कऱ्हावागज- 33x11 केव्ही

  • अंजनगाव- 33x11 केव्ही

  • सुपा- 33x11 केव्ही

इंदापूर तालुका सबस्टेशन

  • झगडेवाडी- 33x11 केव्ही

  • निरगुडे- 33x11 केव्ही

दौंड तालुका सबस्टेशन

  • कानगाव- 33x22 केव्ही

  • राजेगाव- 33x22 केव्ही

  • रोटी- 33x22 केव्ही

हवेली तालुका सबस्टेशन

  • वारजे- 22x11 केव्ही

  • वडकी- 33x22 केव्ही

पुरंदर तालुका सबस्टेशन

  • बेलसर- 33x11केव्ही

  • वीर- 33x11 केव्ही

  • दिवे- 33x22 केव्ही

वेल्हे तालुका सबस्टेशन

  • पासनी- 33x11 केव्ही

  • मार्गासनी- 33x11 केव्ही

भोर तालुका सबस्टेशन

  • कमथडी (मोहरी)-33x11 केव्ही

  • वेळू- 33 बाय 22 केव्ही

  • न्हावी- 33 x 22 केव्ही

  • भोर- 33x22 केव्ही

मुळशी तालुका सबस्टेशन

  • कुंभेरी- 33x22 केव्ही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com