सुप्रिया सुळे यांना 'पार्लमेंट्रियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रन' पुरस्कार जाहीर

सुप्रिया सुळे यांना 'पार्लमेंट्रियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रन' पुरस्कार जाहीर

बारामती शहर : ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेचे वतीने देण्यात येणारा 'पार्लमेंटरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रन' पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. 

राज्यभरातील विशेष मुले आणि अंगणवाड्या तसेच शालेय शिक्षण आणि शिक्षकांसाठी सुप्रिया सुळे सातत्याने कार्यरत आहेत. विशेष मुले वास्तवात कर्णबधीर असतात. त्यांना ऐकू येत नाही, म्हणून ती बोलू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट तसेच पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अशा मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसविण्याचा कार्यक्रम घेत असतात. 

2013 पासून हे कार्य चालू आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात नुकतेच घेतलेल्या या कार्यक्रमाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक’नेही दखल घेतली. जागतिक विक्रम झालेल्या या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल 4846 जणांना श्रवणयंत्रे बसविण्यात आली. याशिवाय आपल्या मतदार संघातील एकही मुलगी शाळेच्या दूर अंतरापायी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी दरवर्षी सुप्रिया सुळे या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करतात. 

गेल्या वर्षी पंधरा तर यावर्षी दहा हजारांहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले. याशिवाय अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना पाणी, वीज, पोषण आहार आणि अन्य कशाचीही कमी पडू नये, यासाठी त्या सतत कार्यशील आहेत. या सर्व कामांची दखल घेत ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रियन अॅवॉर्ड फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार सुळे यांना जाहीर झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com