इंदापूरचा दौरा अर्धवट सोडून सुप्रियाताई गेल्या बारामतीला...

bhigvan
bhigvan

भिगवण (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे या शनिवारी (ता. १८) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. मात्र, आपला दौरा अर्धवट सोडून त्या पुन्हा बारामतीकडे परतल्या. त्यामुळे तालुक्यात चर्चा सुरू झाली. मात्र, स्वतः सुप्रिया सुळे यांनी दौरा अर्धवट सोडण्यामागचे कारण आपल्या व्हाॅट्सअॅप स्टेटद्वारे जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिला. 

खासदार सुप्रिया सुळे या सध्या बारामती येथे आहेत. त्यांचा आज इंदापूर तालुक्याचा दौरा होता. त्यानुसार सकाळी त्या इंदापूर येथे आले. येथील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्रीकांत महादेव स्वामी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पत्नी व इंदापूरच्या नगरसेविका उषाताई व स्वामी कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. या वेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होत. 

इंदापूर येथील भेटीनंतर सुप्रिया सुळे या भिगवण येथील कोविड केअर सेंटरला भेट देणार होत्या. तसेच, मदनवाडी येथे भिगवण- शेटफळगढे गटाचे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या कुटुंबियांची त्या सदिच्छा भेट घेणार होत्या. मात्र, इंदापूर येथील भेटीनंतर त्यांनी आपला पुढचा दौरा रद्द केला आणि त्या बारामतीकडे रवाना झाल्या. त्यामुळे तालुक्यात चर्चा सुरू झाली.

हनुमंत बंडगर यांच्या कन्येचा नुकताच विवाह झाला आहे. या विवाह सोहळ्याचे सु्प्रियताई यांना आग्रहाचे निमंत्रण होते. मात्र, त्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे बंडगर कुटुंबियांची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्या येणार होत्या. परंतु शुक्रवारी (ता. १७) रात्री मदनवाडी- चौफुला येथील एक हॉटेल व्यवसायिक कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यातून परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सुप्रियाताई यांना आपली नियोजित सदिच्छा भेट रद्द करण्यात आली. तसेच, त्यांनी भिगवण येथील कोविड केअर सेंटरला भेट देण्याचेही पुढे ढकलले. त्यामुळे त्या थेट बारामतीकडे रवाना झाल्या. मात्र, पुढील आठवडयात त्या बंडगर कुटुंबियांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती सुप्रियाताई यांनी आपल्या व्हाॅट्सअॅप स्टेटद्वारे जाहीर केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
याबाबत जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर म्हणाले की, माझ्या कन्येच्या विवाहाचे निमंत्रण खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिले होते, परंतु त्या दिवशी त्या येऊ शकल्या नव्हत्या त्यामुळे त्यांनी शनिवारी येण्याचे नियोजन केले होते. परंतु, मदनवाडी चौफुला येथे एक रुग्न कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे नियोजित भेट रद्द करण्यात आली आहे. त्या पुढील आठवडयात भेट देणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com