कामगारांचे वेतन रखडल्याने सुप्रिया सुळेंचे पालिका आयुक्तांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेले हे पत्र पालिका उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी स्विकारले व येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.
Letter
LetterSakal

किरकटवाडी : पुणे महानगर पालिका (Pune Corporation) हद्दीलगतच्या 23 गावांचा पालिका हद्दीत समावेश होऊन सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामगारांचे पगार न झाल्याने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुणे पालिका आयुक्तांना पत्र लिहून सहकार्य करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेले हे पत्र पालिका उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी स्विकारले व येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर जे अधिकृत कामगार आहेत त्यांच्याच पगाराबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही उपायुक्त मुठे यांनी स्पष्ट केले आहे. (Pune Marathi News)

23 गावांचा पालिका हद्दीत समावेश होऊन सहा महिने उलटून गेले असले तरी अद्याप कामगारांना वेतन न मिळाल्याने कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असल्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघ ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिले होते. त्या निवेदनाच्या संदर्भाने खासदार सुप्रिया सुळे यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहून कामगारांच्या पगाराबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

Letter
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ट्विटद्वारे माहिती

खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांचे पत्र देण्यासाठी त्रिंबक मोकाशी,माजी नगरसेवक बाबासाहेब धुमाळ,सुभाष नानेकर,बाप्पू दांगट,स्नेहल अमोल धावडे, अतुल धावडे,अमोल कारले, तुकाराम इंगळे,सारंग राडकर, भगवान गायकवाड,संजय धावडे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपायुक्त राजेंद्र मुठे यांने हे पत्र स्विकारले व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

" चौकशी समितीने ज्या 450 कामगारांची भरती वैध ठरवली आहे केवळ त्याच कामगारांच्या वेतनाबाबत व कायम करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल व कामगारांना वेतन मिळेल. ज्या 650 कामगारांची भरती चौकशी समीतीने नियमबाह्य ठरवली आहे त्याबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नाही." राजेंद्र मुठे, उपायुक्त, पुणे महानगर पालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com