खासदार सुप्रिया यांची सुळे उंड्री गावास भेट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाव भेट दौर्‍याच्या निमित्ताने उंड्री गावातील विठ्ठल मंदीरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उंड्री - समाविष्ट गावातील समस्या सोडविण्या करिता पुणे महानगर पालिकेत निवडून आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांपैकी ८ नगरसेवकांची निवड केली जाईल. प्रत्येक गावासाठी यापैकी एक डेडीकेटेड नगरसेवक दिला जाईल तो या गावातील समस्या महापलिकेत मांडेन, नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यास मदत करेल. असे सुतोवाच खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाव भेट दौर्‍याच्या निमित्ताने उंड्री गावातील विठ्ठल मंदीरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गावातील सोसायटीधारक व त्यांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची बहुसंख्य नागरिकांनी मागनी केली. येत्या 8 मेला महापालिका आयुक्त व संबधित आधिकर्‍यांची याबाबत बैठक घेउन प्रश्न सोडविण्याचे सुळे यांनी आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे नियोजन व सुत्र संचालन पंचायत समीती सदस्य सचिन घुले पाटील उपसरपंच नितीन घुले पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाला सरपंच निवृत्ति बांदल, जि. प. सद्स्या सुरेखा चौरे, राहूल शेवाळे, जालिंदर कामठे, तसेच पुणे महापालिकेचे अधिकारी आहिरे उपस्थित होते. दरम्यान आदर्श संसद्पट्टू पुरस्कार मिळाल्याबद्दल उंड्रीवासीयांच्या वतीने सुळे यांचा सत्कार करण्यात आला. 

नव्याने समाचिष्ट झालेल्या गावात निवदणूका होण्यास चार वर्षाचा कालावधी आहे, तोपर्यंत गावांचा कारभार रामभरोसे चालणार का? या गावातून स्वीकृत नगरसेवक द्या? महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतीचा कारभार चांगला होता. पटकन कामे व्हायची. असे एक ना दोन अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी उपस्थितांनी उडविली. दुसरीकडे उपस्थितांपैकी अनेकांनी सुळे यांच्याकडे सेल्फी काढण्याचा आग्रह धरला, तो त्यांनी पुर्ण केला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Supriya Sule Meets Undri Village