अभियंत्यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर कारवाई कधी? सुप्रिया सुळे यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे प्रियांका आणि पंकज या दोन गुणी संगणक अभियंत्यांचा बळी गेला. याप्रकरणी केवळ गुन्हा दाखल करून घेण्यापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही. गृहखात्याला प्रियांका आणि पंकजच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले कर्मचारी सापडत नाहीत का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. 

खराडी येथील ट्रान्सफार्मरचा स्फोट होऊन त्यात प्रियांका झगडे आणि पंकज खुने हे दोन संगणक अभियंते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. असे असताना महावितरणने या स्फोटाची जबाबदारी झटकत ट्रान्सफार्मरच्या शेजारी असलेल्या स्टॉलवर टाकली असल्याचे समोर आले होते. तसेच, या प्रकरणात विद्युत निरीक्षकांनी दिलेला अहवालही खोटा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. परंतु महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिस गप्प बसले असल्याचे निदर्शनास आले.

पोलिस आणि महावितरणच्या चुकीमुळे अभियंत्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळू शकत नसल्याचे समोर आल्याने "सकाळ'ने उघडकीस आणले होते. त्याची दखल घेत खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर ट्विट, तसेच फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त करून या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. या ट्विटच्या माध्यमातून सुळे यांनी पोलिसांच्या कारभारावरही ताशेरे ओढले आहेत. 
 
Web Title: Supriya Sule raise a question about action was taken regarding the death of engineers