पुणे-बारामती मेमू रेल्वेसाठी सरसावल्या सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
Saturday, 13 February 2021

पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी होऊ शकेल. पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली असून या मार्गाचे विद्युतीकरण देखील पुर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'मेमू' लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यावेळी सुळे यांनी केली. 

बारामती : पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार सुनील तटकरे आणि फौजिया खान यांनी गोयल यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. 

पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी होऊ शकेल. पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली असून या मार्गाचे विद्युतीकरण देखील पुर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'मेमू' लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यावेळी सुळे यांनी केली. 

पुण्यात गुंडांनी दिले पोलिसांनाच आव्हान; दहशत माजवण्याचा प्रयत्न! 

May be an image of 4 people, people standing and indoorदौंड स्थानकावरुन बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-मुंबई प्रगती (12126 / 12125) एक्स्प्रेसला दौंड पर्यंत प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणीही सुळे यांनी केली. पुणे - सिकंदराबाद, चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस, हमसफर, संपर्क क्रांती या गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. 

नीरा, पुरंदर येथील मुस्लिम बांधवांना प्रार्थना स्थळापर्यंत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावा लागतो. याठिकाणी रेल्वेरुळाचे काम होणार असून येथे या कामासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचे काम करावे अशी सुचना केली. नीरा स्थानकावर हजरत निजामुद्दीन-गोवा या गाडीला थांबा देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी केली. जेजुरी स्थानकाचे विस्तारीकरण सुरु असताना प्राथमिक शाळा व अंगणवाडीची इमारत पाडण्यात आली होती. ही शाळा व अंगणवाडीसाठी रेल्वेने पर्यायी जागा उपलब्ध करावी अशीही मागणी यावेळी मांडली.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule request to start Pune-Baramati memu Railway