संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त कीर्तनाचा आनंद घेताना खासदार सुप्रिया सुळे व उपस्थित भाविक.
संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त कीर्तनाचा आनंद घेताना खासदार सुप्रिया सुळे व उपस्थित भाविक. sakal

बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला कीर्तनाचा आनंद..

संत तुकाराम महाराज बीजेचा सोहळा डोर्लेवाडी येथे उत्साहात संपन्न

डोर्लेवाडी : संत तुकाराम महाराज बीजेचा सोहळा डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे उत्साहात संपन्न झाला.पुणे,सोलापूर सातारा जिल्ह्यातील सुमारे ५० हजारहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.खासदार सुप्रिया सुळे यांनीही घेतला कीर्तन श्रवणाचा आनंद."आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी , सकळा सांगावी विनंती माझी ! वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो.! "संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्याचे वर्णन होताच टाळ मृदंगाच्या ठेक्यात हरिनामाचा अखंड गजर सुरु झाला...अन पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा जयघोष होताच उपस्थित हजारो भाविकांनी जड अंतकरणाने श्रींच्या मूर्तीवर गुलाल पुष्प वर्षाव करून डोर्लेवाडी (ता.बारामती) येथे संत तुकाराम बीजेचा सोहळा साजरा केला.

प्रती देहू समजल्या जाणाऱ्या येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात आज (ता.२० ) ५० हजार हून अधिक भाविकांनी 'याची देही याची डोळा' बीजेचा सोहळा अनुभवला. देवस्थान समिती व सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने बीज उत्सव सोहळ्यानिमित्त (ता.१३ ) पासून ६३ व्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शैला महाराज यादव व बाळासाहेब नाळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली टाळ मृदंगाच्या गजरात भव्य गाथा पारायण झाले.भागवत शिंदे, अर्जुन क्षीरसागर,राजकुमार खंडागळे,विजय शेंडे,शैला यादव,दत्तात्रय घुले,सोमनाथ घोगरे यांची प्रवचने व तुकाराम महाराज मुळीक,अच्युत नाहाराज शिंदे,शिवाजी महाराज पहाणे,रामराजे महाराज भोसले,सुनिल महाराज माने,चंद्रकांत महाराज सुर्यवंशी यांची कीर्तने झाली.

 येथे संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त कीर्तन करताना लक्ष्मण महाराज कोकाटे व उपस्थित भाविक
येथे संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त कीर्तन करताना लक्ष्मण महाराज कोकाटे व उपस्थित भाविक sakal

आज पहाटेच मंदीरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी महाभिषेक झाल्यानंतर बाळासाहेब महाराज नाळे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे बीजे निमित्त फुलाचे कीर्तन झाले.कीर्तनात त्यांनी संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र व त्यांनी समाजासाठी केलेल्या अलौकिक कार्याचे वर्णन केले.दुपारी १२ वाजता अखंड हरिनामाचा गजर झाला. त्याच बरोबर अत्यंत जड अंतकरणाने भाविकांनी गुलाल पुष्प वर्षाव करून बीजेचा सोहळा साजरा केला.दुपारी परिसरातील नामवंत भजन गायकांचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली.

यात्रेचे सरस नियोजन ...

कोरोनामुळे गतवर्षी यात्रा झाली नव्हती त्यामुळे यावर्षी येथील यात्रेला हजारो भाविक दर्शनासाठी येणार याची यात्रा समितीला खात्री होती त्यानुसार भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण मंदीर परिसर, बारामती- वालचंदनगर मार्ग व इतर अंतर्गत रस्त्यांवर सुमारे ८० हजार चौरस फुटांचे भव्य मंडप टाकण्यात आले होते.ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्वच्छता, रस्ते दुरुस्ती,तसेच शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली होती.बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.वीज मंडळाच्या वतीने अखंड वीज पुरवठा करणेत आला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. सामाजिक संस्था व स्थानिक पदाधिकारी यांच्यावतीने मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीक्षेत्र देहूला बीज सोहळ्याला जाणाऱ्या अनेक भाविकांनी येथील बीजेच्या सोहळ्याचे नियोजन उत्कृष्ट असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला कीर्तनाचा आनंद....

येथील बीज उत्सवाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून भेट दिली. त्या आल्यानंतर किर्तन सुरू होते. सुमारे एक तासभर त्यांनी कीर्तनकार लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे समोर बसून कीर्तन व भजनाचा आनंद घेतला. त्यांनी स्वतःचा सत्कार झाल्यानंतर आपली शॉल एक महिला भाविक व पुष्पगुच्छ पखवाजवादक यांना देऊन सन्मानित केले..अनपेक्षित पणे झालेल्या या सत्काराने दोघेही भारावून गेले होते. आरती नंतर त्या बारामतीकडे रवाना झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com