Loksabha 2019: सुप्रियाताई मोदींना फॉलो करताय; घरात घुसून मारू म्हणताय- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

सुप्रिया सुळे यांनीही मोदींचा गुण घेतला आहे
'घरात घुसून मारण्याची' भाषा सुप्रियाताई करत आहेत

इंदापूर (पुणे): सुप्रिया सुळे यांनीही मोदींचा गुण घेतला आहे. मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानला घुसून मारणार अस सांगितलं त्याप्रमाणे त्या 'घरात घुसून मारण्याची' भाषा करत असल्याची आठवण ऑडिओ क्लिप लिक प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमधील भाजपयुतीच्या विजयी संकल्प सभेत करून दिली. राहुल शेवाळेंनी घाबरण्याची काही गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत फडणवीस बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी ही आठवण करून दिली. यावेळी व्यासपीठावर रासपचे महादेव जानकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला भाड्याने वक्ते आणावे लागत आहेत. बस, सायकल भाड्याने घेतात पण पवार साहेबांनी इंजिन घेतलं आहे. तेही बंद पडलेलं आहे. ते ना विधानसभेत चाललं, ना पालिकांमध्ये जे लोक पहिल्या बॉलवर आउट होतात त्यांनी आम्हाला क्रिकेट शिकवू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी राज ठाकरे यांना दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule Speak like narendra Modi criticized by Devendra Fadnavis