सांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन गरजेचे - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

इंदापूर/ नीरा नरसिंहपूर - ‘लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी स्तुत्य उपक्रम अप्पासाहेब जगदाळे यांनी राबविला आहे. हा उपक्रम भारतीय संस्कृती व मातीशी इमान राखणारा आहे. त्यामुळे युवापिढीवर निश्‍चितच शिक्षणाबरोबरच सुसंस्कारदेखील होत आहेत,’’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

इंदापूर/ नीरा नरसिंहपूर - ‘लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक लोकधारांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी स्तुत्य उपक्रम अप्पासाहेब जगदाळे यांनी राबविला आहे. हा उपक्रम भारतीय संस्कृती व मातीशी इमान राखणारा आहे. त्यामुळे युवापिढीवर निश्‍चितच शिक्षणाबरोबरच सुसंस्कारदेखील होत आहेत,’’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

सराटी (ता. इंदापूर) येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळातर्फे स्वातंत्र्य दिन तसेच नागपंचमीनिमित्त आयोजित दोनदिवसीय जागर लोककलेचा, सन्मान सौभाग्यवतीचा, खेळ पैठणीचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात उद्‌घाटक म्हणून खासदार सुळे बोलत होत्या. या वेळी सुळे यांचा मंडळाचे अध्यक्ष तथा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध प्रकारचे पाळणे तसेच खाद्ययात्रा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. हालगीचा निनाद तसेच संभलच्या तालावर युवापिढी थिरकली. 

आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अप्पासाहेब जगदाळे यांची भाषणे झाली. सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, मंगलसिद्धी दूध संघाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र तांबिले, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, अशोक घोगरे, प्रताप पाटील, अकलूज प्रांताधिकारी शमा पवार, बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरवातीस पोतराज, गारूडी, वाघ्या मुरळी, वासुदेव, बोहारीण बाई, हाताच्या खुणांनी नाव सांगणे आदी कार्यक्रम पार पडले. सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, तालुकाध्यक्षा रेहाना मुलाणी, जिल्हा बॅंकेच्या संचालिका वर्षा शिवले, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सविता व्होरा यांनी जात्यावरील ओव्या, फुगडी, जिबल्या, काटवट कणा, मंगळागौर, झोके, नागपंचमीनिमित्त गीतांचा आनंद लुटला.

Web Title: Supriya Sule Talking