सुळे मंगळवारी बारामती दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

बारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी (ता. १४) बारामती दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या विविध गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत, तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व महिलाध्यक्षा वनिता बनकर यांनी दिली. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता निंबूतपासून हा दौरा सुरू होणार आहे. गडदरवाडी, खंडोबाचीवाडी, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, करंजेपूल, सोरटेवाडी, होळ आठ फाटा, सदोबाचीवाडी, कोऱ्हाळे खुर्द, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक, थोपटेवाडी या गावांना त्या भेट देणार आहेत.  

Web Title: supriya Sule on the tour of Baramati on Tuesday