Election Results : सुप्रिया सुळे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी

baramati_sule.jpg
baramati_sule.jpg

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आता मताधिक्याचा लाखाचा टप्पा पार केला असून विजय ही आता त्यांच्यासाठी औपचारिकताच उरली आहे. या विजयाने सुप्रिया सुळे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. 


गेल्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होत बारामती हा अजूनही पवारांचाच बालेकिल्ला आहे हेच या निकालाने दाखवून दिले. 2014 प्रमाणेच 2019 मध्येही मोदी लाटेत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज पराभूत झाले, लाट नाही असे म्हटले जात होते प्रत्यक्षात मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवरच विश्वास व्यक्त केल्याचे मतपेटीतून पुढे आले. मात्र या लाटेतही सुप्रिया सुळे यांनी गेल्या पाच वर्षात केलेले काम व नियमित मतदारसंघाशी ठेवलेला संपर्क या बळावर लाखाहून अधिकचे मताधिक्य प्राप्त करत आपले वेगळेपण अधोरेखीत केले.

यंदा भाजपने सुळे यांच्या पराभवासाठी कंबर कसली होती, पण त्यातही सुळे यांनी मतदारांच्या मनात आपल्याप्रती विश्वास कायम ठेवत विजयी वाटचाल केली आहे. नरेंद्र मोदी व अमित शहांसह देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी सर्वतोपरी जोर लावूनही बारामतीची जागा त्यांना काही जिंकणे यंदाही शक्य झाले नाही, हेही या निकालाने स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com