Election Results : बारामतीत सुप्रिया सुळेंयांची विजयाकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सत्तर हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु झाली आहे. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे.

देशात मोदी लाट असल्याचे चित्र असले तरी बारामतीने पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवरच आपला विश्वास व्यक्त केल्याचे दिसत आहे. अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यापासून संपूर्ण भाजपने बारामतीत ताकद लावली होती, राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले असले तरी बारामती जिंकण्याचे स्वप्न मात्र पूर्ण होणार नाही अशीच चिन्हे आहेत.

प्रारंभी कांचन कुल यांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते, त्या नंतर मात्र सुप्रिया सुळे यांची आघाडी प्रत्येक फेरीगणिक वाढतच गेली. राज्यातील पकड मजबूत राखण्यात अपयश आले असले तरी बारामतीवर अद्यापही पवार कुटुंबाचेच वर्चस्व कायम आहे हे चित्रातून पुढे येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Suleyan's victory in Baramati wins