राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी सुरेश घुले यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मांजरी : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

मांजरी : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

सुरेश घुले यांनी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी काम करून आपल्या कामाची ओळख निर्माण केली. त्यातुनच त्यांना पुढे कृषिउत्पन्न बाजार समितीवर अध्यक्ष म्हणून तर यशवंत सहकारी साखर कारखान्यावर प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. सध्या ते पक्षाचे सातारा जिल्हा निरिक्षक व  जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करीत आहेत.
 
Web Title: Suresh Ghule appointed as NCP's vice president