पुणे : सुरेशराव केतकर संघमय जगले; मोहन भागवत

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन, प्रांतिक बैठकीला सुरवात
Sureshrao Ketkar lived in union rss Mohan Bhagwat pune
Sureshrao Ketkar lived in union rss Mohan Bhagwat pune sakal

पुणे : ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर संघमय जीवन जगले. त्यांची संघ तपश्चर्या मोठी होती. कार्यकर्ता घडविण्यासाठी ‘संघयोगी’ हे सुरेशराव केतकर- आठवणी व लेखांचे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल,’’ असा आशावाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे पुण्यानजीक फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेत आयोजित दोन दिवसीय प्रांतिक बैठकीला शनिवारी (ता.२३) सुरवात झाली. प्रारंभीच्या सत्रात ‘संघयोगी’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव, सुरेशराव केतकर यांचे पुतणे शिरीष केतकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव आणि पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भागवत म्हणाले, ‘‘सुरेशराव केतकर यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी संघ होता. त्यांची प्रत्येक कृती संघ विचारांनी प्रेरित व विवेकी होती. संघमय जीवन कसे असावे, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते.’’

या प्रांतिक वार्षिक बैठकीत डॉ. भागवत पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील पुणे महानगरासह सात जिल्हे, तालुका स्तरापर्यंतच्या प्रमुख सुमारे दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले आहेत. डॉ. दबडघाव यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील संघकार्य, कोरोना काळातील मदतकार्याचा आढावा आणि बैठकीतील विषयांची मांडणी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २०२५ साली शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रम, शाखा विस्तार, कार्यकर्ता गुणवत्तावाढ, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण, समरसता, संघकामातून परिवर्तन आणि रोजगारांच्या संख्येतील वाढीच्या दृष्टीने उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com