सर्जिकल स्ट्राइक हा इशारा - ले. ज. निंभोरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुणे - ‘सर्जिकल स्ट्राइक हे केवळ उरी येथे झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर नव्हे, तर पाकिस्तानच काय, तर कोणताही देश भारताविरुद्ध कुरापती करण्याचा विचारही करत असेल, तर त्यांना हा इशारा आहे,’ असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले. विदर्भवासी पुणे निवास संस्थेच्या  १३ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

२०१६ ला झालेल्या सर्जिकल स्ट्राइक कारवाईत सामील ले. जनरल निंभोरकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’ यावर निंभोरकर यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. 

निंभोरकर म्हणाले, ‘एकूण सात ठिकाणी आम्ही हल्ले करून ८२ अतिरेकी टार्गेट केले. माझ्या नेतृत्वात तीन ठिकाणे होती. माझ्या नेतृत्वातील जवानांनी २९ अतिरेकी ठार केले. मनोहर पर्रीकर यांनी आर्मीला नेहमीच मदत करत आमच्या प्रस्तावांना विचारात घेतले.‘सर्जिकल स्ट्राइक’ हे त्यापैकीच एक आहे. त्यांच्यासारखे संरक्षणमंत्री होणे नाही. ते जर आणखी दोन वर्ष संरक्षणमंत्री राहिले असते, तर भारताच्या सैन्यदलाचा कायापालट झाला असता.’

या वेळी गाडगीळ यांनी विचारलेल्या, अशी कारवाई करताना टार्गेटला कळू नये म्हणून काय दक्षता घेतली जाते? या प्रश्नावर निंभोरकर म्हणाले, ‘कारवाईसाठी रात्री ३ ते ४ दरम्यानची वेळ निवडली होती. सामान्य लोक अमावस्येला अशुभ मानत असले तरी, आमच्यासाठी मात्र काळोखाची नेहमी मदतच होते. ज्या भागात आम्ही टार्गेट केले त्या भागाचा अभ्यास तेथे जाण्यापूर्वी आम्ही करून घेतला होता. काही वेळा कुत्रे भुंकण्याची आणि त्यामुळे टार्गेट अलर्ट होण्याची शक्‍यता असते; पण बिबट्याचा वास आला की कुत्री शांत होतात. याचाच फायदा घेत आमच्या सैनिकांनी बिबट्याची विष्ठा सोबत बाळगली. जेथे कुत्री असण्याची शक्‍यता वाटायची तेथे ती विष्ठा पसरवून दिली गेली.’  आगामी ‘उरी’ चित्रपट हा मोठ्या पडद्यावरून सामान्यांना भारतीय सेनेच्या पराक्रमाचे प्रतीक ‘सर्जिकल स्ट्राइक’ मांडत आहे, याचे समाधान असल्याचेही मत निंभोरकर यांनी व्यक्त केले. 

Web Title: Surgical Strike Warning Rajendra Nimbhorkar