सुशील मंचरकर यांना अटक

संदीप घिसे 
शनिवार, 16 जून 2018

पिंपरी (पुणे) - महिलेवरील खूनी हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी अँड. सुशील मंचरकर यांना शुक्रवारी सायंकाळी गवळीमाथा येथून अटक केली.

सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत. तुरूंगातील आरोपी पळवून लावणे, कामगार नेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट रचणे, असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या गुन्हयांमध्ये त्यांना मोक्का लावण्यात आला आहे.

याच आठवड्यात पिंपरीत एका महिलेवर गोळीबार झाला होता. त्या महिलेने २०१४ मध्ये मंचरकर यांच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती. गोळीबार प्रकरणी खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली.

मंचरकर यांना मोक्काच्या गुन्हयात जामीनाबाबत उच्च न्यायालयात १८ जून रोजी सुनावणी आहे. तोपर्यंत त्यांना अटक करता येणार नाही. मात्र खुनी हल्ल्याच्या पोलिस त्यांचा शोध घेत होते. मंचरकर हे गवळीमाथा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी सुरेन्द्र आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गणेश पाटील. पोलिस कर्मचारी स्वप्नील शिंदे, सुरेन्द्र आव्हाड यांनी मंचरकर यांना गवळीमाथा येथून अटक केली.

Web Title: Sushil Mancharkar arrested