पायलट होण्याचे स्वप्न पाहणारा झाला एमपीएससी उतीर्ण

 sathe.jpg
sathe.jpg

पारनेर : ''वडील परिवहन महामंडळात वाहकाचे काम करत असल्याने मोठ्या वाहनात बसणे ते चालवणे याचे बालपणापासूनच मोठे आकर्षण जडले होते. त्यातून थेट वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. 25 लाख रूपये खर्च करून प्रशिक्षणही घेतले चार पाच वर्ष प्रयत्न करूनही त्याला आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंख मिळाले नाहीत शेवटी ही सल मनात सतत राहिल्याने पुढे जिद्दीने अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व एकाच वेळी विक्रीकर सहाय्यक व मंत्रालयात सहाय्यक पदासाठी निवड झाली आणि माझा आनंद गगणात मावेनासा झाला.''
  
ही कथा आहे हंगे येथील सुशिलकुमार राजेंद्र साठे यांची. सुशिलकुमारचे वडील परिवहनमंडळात वाहक म्हणून काम करत होते. घरची परिस्थिती बेताची मुलगा सुपे येथील महविद्यालयातून 12 वी झाला मात्र त्याने वैमाणिक व्हायचे हा ध्यास घेतला होता. आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ते आपले काम नाही असे वडीलांनी समजावून सांगितले मात्र, त्याने ऐकले नाही. शेवटी वडीलांनी मुलाच्या हट्टपायी होती नव्हती तेवढी जमीन 25 लाख रूपयांना विकली व जमिन विकून मुलाला थेट फिलीपाईन्स येथे कमर्शियल पायलटच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. त्याने दोन वर्षाचे पायलचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले व तो भारतात आला. आईवडीलांना आनंद झाला अता आमचा मुलगा वैमाणिक होणार या आनंदात काही दिवस गेले. सुशिलकुमारचे दैव मात्र आडवे आले. भारतात त्या वेळी या क्षेत्रात मोठी मंदी असल्याने प्रयत्न करूणही त्याला पायलट म्हणून कोठेच नोकरी लागेली नाही. शेवटी कुटुंबाची उपासमार सुरू झाली आईवडील नाराज झाले. 

 पुढे  त्याने एम.बी.ए. ही केले परंतू कुटुंबाचे हाल पाहून त्याने खाजगी कंपनीत नोकरी स्वीकारली. खाजगी नोकरीत मन रमेना. काही दिवस काम करून शेवटी नोकरीचा राजिनामा दिला. पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात सुशिलकुमारने बाजी मारली. तो राज्यलोकसेवा परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि एकाच वेळी त्याची सहाय्यक विक्री कर अधिकारी व मंत्रालयात सहाय्यक म्हणून निवड झाली. त्याच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 ''आयुष्यात नाराज न होता केवळ आईवडीलांच्या पाठिंब्यावर व स्वताःच्या जिद्दीवर मी हे य़श मिळविले आहे. दुःख एवढेच आहे की, मला पायलट होण्याचे माझे स्वप्न पुर्ण करून आवकाशाला गवसणी घालता आली नाही. मात्र, मी या पुढेही स्पर्धा परीक्षा देऊन आणखी उच्च पदासाठी प्रयत्न करणार आहे.
- सुशिलकुमार साठे, साहय्यक विक्रीकर अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com