आमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'' ,असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या टिकेविरोधात दिले आहे. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. 

पुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या टिकेविरोधात दिले आहे. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. 

विरोधी पक्षांच्या काल झालेल्या रॅलीनंतर, आगामी निवडणुकांमध्ये 'मजबूत सरकार की मजबूर सरकार' अशी स्थिती असून कॉंग्रेसकडे चेहरा नसल्याची अशी टिका भाजप केली. याबाबत उत्तर देताना ते म्हणाले''आमचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. कॉंग्रेस पक्ष म्हणुन राहूल गांधीचे नाव जाहीर झाले असले तरी मोठी आघाडी होते तेव्हा सर्वांना बरोबर घेवून जावे लागते. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत. '' 

 ते म्हणाले  '' विरोधकांच्या रॅलीत महाआघाडीत 22 ते 24 पक्ष जोडले आहे. महाराष्ट्रात याचा फायदा होत आहे. जाती विरोधात, धर्म विरोधात जी शक्ती काम करत आहे त्याविरोधात धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर लढणार  आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवा़दीसोबत महाआघाडीत बाबत चर्चा अद्याप सुरु आहे. एमआयएमचा काही प्रश्न नाही. हायकमांडनी आदेश दिल्यास लोकसभेत मी लढण्यास तयार आहे. 

आघाडीत फुट पडल्याचे चित्र दिसत असून याबाबात ते म्हणाले, ''सप आणि बसपने कॉंग्रेसला वाळीत टाकलेले असले तरी आम्ही स्वतंत्रपणे लढू''

Web Title: Sushilkumar shinde speaks About alliance