सर्वधर्मसमभावाची चळवळ नाजूक - शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुणे - ‘‘गेल्या साडेचार वर्षांमध्ये आम्ही जे भोगतो आहे, त्याला ‘सामाजिक समतेचे प्रवाह’ या पुस्तकातून उत्तर दिले आहे.

सर्वधर्मसमभावाची चळवळ नाजूक आहे, त्यामुळे कोणत्याही एका समाजाच्या नेतृत्वाला चळवळ बळी तर पडत नाही ना, याचा विचार करावा लागतो,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. 

द युनिक फाउंडेशन आणि गाजियोद्दीन संशोधन केंद्रातर्फे प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. पत्रकार आरेफा खानम शेरवानी, माजी पोलिस उपायुक्त सुलतान शेख, अजीज बेन्नूर, ‘द युनिक फाउंडेशन’च्या संचालिका मुक्ता कुलकर्णी, कार्यकारी संचालक विवेक घोटाळे, ‘द युनिक ॲकॅडमी’चे संचालन मल्हार पाटील आणि कलीम अजीम उपस्थित होते.

शेरवानी म्हणाल्या, ‘‘भारत एका रंगाचा देश असल्याचे भासविले जात आहे. प्रत्यक्षात भारत विविधरंगी आहे. अशा विविधरंगी भारताला वाचविण्यासाठी लढाई लढली जात आहे. ताजमहाल, लाल किल्ला हा मुस्लिम वारसा असल्याचे आपल्याला सांगितले जाते; पण प्रा. बेन्नूर यांच्यासारख्या लोकांनी भारतात मुस्लिमांची ओळख व त्यांची अस्मिता शोधून मराठीत साहित्यकृती निर्माण केल्या, त्या खऱ्या अर्थाने मुस्लिम वारसा आहेत.’’ प्रास्ताविक कलीम यांनी केले. सूत्रसंचालन सरफराज अहमद यांनी केले. केदार देशमुख यांनी आभार मानले.

Web Title: Sushilkumar Shinde Talking