संशयित खलिस्तानवादी चाकण येथून ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे : दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने चाकण (जि. पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित खलिस्तानवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियमान्वये (युएपीए) कारवाई केली. खलिस्तानच्या निर्मितीसाठी तो पाकिस्तानसह इतर देशांमधील दहशतवादी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, त्याच्या एका साथीदाराला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. 

हरपालसिंग नाईक (वय 42, रा. बेल्लारी, कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तो मूळचा पंजाबमधील मुगलमाजरा येथील आहे. एटीएसच्या पथकाने नाईक याला चाकण येथे ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडून पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली होती. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याला न्यायालयाने दहा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

तपासादरम्यान, नाईक हा इंटरनेट आणि सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आणि तो स्वतंत्र खलिस्ताननिर्मितीचा पुरस्कर्ता असल्याचे दिसून आले आहे. शस्त्रास्त्र गोळा करण्यासोबतच तो देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी तरुणांना भडकावत असल्याचेही तपासात समोर आले. त्याला सोमवारी शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तो आणि त्याच्या साथीदारांनी भारताच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याची तयारी केली. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियम (यूएपीए) कलम लावण्यात आले आहे. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत 17 डिसेंबरपर्यंत वाढ केल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
Web Title: Suspected Khalistani Arrested in Chakan