शासकीय रक्कमेचा अपहार प्रकरणी निलंबित ग्रामसेवकास अटक

दत्ता म्हसकर
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

जुन्नर : मंगेश कृष्णा ठोंगिरे,(वय  ३६ रा. ओतूर, ता.जुन्नर) या निलंबित ग्रामसेवकास जुन्नर पोलिसांनी आज  (ता.14) चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर अटक केली आहे. दोन वर्षापूर्वी शासकीय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी त्यास निलंबित करण्यात आले होते. त्याने संगनमताने  ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचाच्या सहीने ४ लाख ९३ हजार रुपये बॅंकेतुन काढुन शासकीय रक्कमेचा अपहार केल्या बाबतची फिर्याद २०१७ मध्ये पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

खैरे-खटकाळे-देवळे  ग्रामपंचायतमध्ये हा अपहार २०१६-१७ मध्ये झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.  याबाबत ग्रामपंचायतीचे दप्तर कार्यालयात उपलब्ध नसल्याचे तसेच मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा अपहार झाल्याची विद्यमान सरपंच शकुंतला मोरे यांची तक्रार होती. त्यानुसार जिल्हा परिषद कार्यालयाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली होती.  जिल्हा परिषद कार्यालयाच्या चौकशीत प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने जुन्नर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ठोंगिरे यांना अटक करण्यात आली आहे. 

ग्रामपंचायतीचे मागील पाच वर्षांच्या काळातील दप्तर कार्यालयात उपलब्ध नाही. मागील काळात घरपट्ट्या वसुल करण्यात आलेल्या नाहीत. गावात कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नसताना देखील ठराविक लोकांच्या नावे शासकीय निधी चेकद्वारे खर्ची टाकल्याचे बँकेच्या विवरण पत्रावरून निदर्शनास येत आहे. अशा रितीने वर्ग करण्यात आलेल्या रक्कमे संबाधित व्यक्तीच्या नावे टाकून कोणत्या प्रकारची कामे केली याची चौकशी होऊन त्यांचेकडून सर्व रक्कम व्याजासहीत वसुल करण्यात याव्यात.

चौदावा वित्त आयोग, पैसा निधी, ग्रामनिधी या माध्यमातून विकासकामे झाल्याचे दाखविण्यात आलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. मात्र निधी खर्ची दाखविण्यात आला आहे. ग्रामपंचायतीसाठी मिळालेली होडी किसन केदारी यांना परस्पर विकण्यात आली असुन ग्रामसभेत केलेल्या ठरावाप्रमाणे होडी परत करण्याचे कबुल करून देखील अद्याप परत केलेली नाही. त्याचेवर देखील कारवाई करण्याची मागणी सरपंच मोरे यांनी केली होती.
 
Web Title: Suspended gramsevak arrested In case of Government Amount Dispatch