पुणे : संशयास्पद दुचाकीचालकाकडून सव्वा लाख रुपयांचा गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पुणे : दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे चार किलो 713 ग्रॅम इतक्‍यावजनाचा सव्वा लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक व अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. 

पुणे : दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे चार किलो 713 ग्रॅम इतक्‍या वजनाचा सव्वा लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक व अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. 

इसाक जैनुद्दीन शेख (वय 50, रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर खंडणी विरोधी पथक व अंमली पदार्थविरोधी पथकाकडून शहरात कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे गैरव्यवहार होऊ नयेत, यासाठी पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव व त्यांचे समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी भवानी पेठेतील सय्यद शहाबाबा दर्ग्याचे समोरील रस्त्यावर शेख हा त्याच्या दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. 

पथकातील पोलिसांनी त्याची मोपेड दुचाकी अडवून त्याची तपासणी केली असता, त्यावेळी दुचाकीच्या डिकीमध्ये चार किलो 713 ग्रॅम इतके वजन असणारा तब्बल सव्वा लाख रुपये किंमतीचा गांजा त्याच्याकडे आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली

Web Title: Suspicious bike driver seized gaja worth Rs 1.25 lakh