wa.jpg
wa.jpg

वाघोलीकरांनो, आता तुम्हाला पुण्यात जायची गरज नाही...

वाघोली : बी. जे. एस. येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णांच्या संपर्कातील संशयितांचे स्वॅब घेण्याच्या प्रक्रियेला आज प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी आठ जणांचे स्वॅब घेण्यात आले. ते तपासणी साठी एनआयव्हीमध्ये पाठविण्यात येणार आहेत.

तपासणीचा अहवाल येईपर्यंत संशयितांना तेथेच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर पॉझिटिव्ह असणारे मात्र लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोविडच्या चाचणीसाठी पूर्व हवेलीतील संशयितांना शहरात जावे लागत होते. येथील बी. जे. एस. क्वारंटाईन सेंटरमध्येच स्वॅब घेण्याची व्यवस्था व्हावी व पॉझिटिव्ह  मात्र लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी येथे रुग्णालयाची व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अशोक पवार, सरपंच वसुंधरा उबाळे प्रयत्नशील होते.

बी. जे. एस. संस्थेने सुरवातीलाच 1000 जणांची क्षमता असणारी इमारत क्वारंटाईन सेंटर म्हणून दिली होती. मात्र येथे स्वॅब घेण्याची सुविधा नव्हती. जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांनीही यासाठी कार्यवाही करून ही सुविधा उपलब्ध करून दिली. यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी तीन वेळा दोन्ही जागेची पाहणी केली होती.

स्वॅब घेण्यासाठीचा चेंबर चार दिवसांपूर्वीच सेंटरमध्ये आला होता. प्रत्यक्षात आज स्वॅब घेण्यास सुरुवात झाली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे लॅब तंत्रज्ञ हे स्वॅब घेणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, सरपंच वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे, मारुती गाडे, नोडल अधिकारी माखरे आदी उपस्थित होते. 

40 बेडचे कोविड सेंटर-आयुर्वेद  महाविद्यालयाचे कोविड रुग्णालय 40 बेडचे आहे. यामुळे पूर्व हवेळीतील पॉझिटिव्ह मात्र लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना पुण्यात दाखल होण्याची गरज पडणार नाही. ते इथे दाखल होऊ शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com