सिंहगडावर व्यावसायिक संघटनेच्यावतीने स्वच्छता अभियान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

खडकवासला : सिंहगडावर व्यावसायिक संघटनेच्यावतीने सिंहगड स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये गडावरील प्लॅस्टिक पिशव्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. 

वाहन तळापासून ते नरवीर तानाजी मालुसरे स्मारकापर्यंत ते संपूर्ण गडावरील कचरा व प्लॅस्टिक असा सगळा कचरा गोळा करून त्याची योग्यती विल्हेवाट लावण्यात आली. 

या अभियानात गडावरील 130हुन अधिक व्यावसायिक सहभागी होते. सकाळी 10वाजल्यापासून दुपार पर्यंत स्वच्छतेचे काम सुरू होते. 
यावेळी, वनविभाग कडून वनपाल हेमंत मोरे, वनरक्षक बाळासाहेब जीवडे, संदीप कोळी, नितीन गोळे व संरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक यांनी या कमी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुग्रीव डिंबळे व विश्वास शिंदे यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य अमोल पढेर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी, घेरा सिंहगडचे माजी सरपंच दत्तात्रेय जोरकर कोंढणपूरचे माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले, घेरा सिंहगडचा माजी उपसरपंच तानाजी चव्हाण, घेरा सिंहगडच्या ग्रामपंचायत सदस्या सीमा पढेर, श्रीगणेश गोफने, यांनी मार्गदर्शन पार भाषण करून स्वछते विषयी महत्व पटवून दिले. पुढील मोहिमेत एक हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्धार  यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन सिंहगड व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष विजय मुजुमले, रवींद्र खाटपे, धर्मराज वाडकर, सतीश चोर, दत्तात्रेय चव्हाण, तृषार मांडले, सिंधुबाई चोरघे, मंगेश डिंबळे, राजेंद्र सोनार, रत्नाबाई  पढेर, रुक्मिणी वाघमारे, राजेंद्र पिलाने, संजय गायकवाड, छबुराव पढेर, सचिन खाटपे, वैजनाथ गुरव, काशिनाथ पढेर, तुकाराम पढेर, कैलास जरांडे, पारुबाई माने, विलास चव्हाण, तुशार डिंबळे, लक्ष्मण पवार, समीर पवार, नंदू जोरकार, सदाशिव शिरोळे, अलकाबाई बादड, आण्णा खाटपे, दत्तात्रय खाटपे,जालिंद्र यादव,  गणेश मिसळ यांनी केले. 

Web Title: swacchata abhiyan on sinhagad from vyavasayik sanghatana