स्वच्छतेत लोणावळा, सासवड शहराने देशपातळीवर मारली बाजी

श्रीकृष्ण नेवसे/ भाऊ म्हाळसकर
Thursday, 20 August 2020

गुरुवारी (ता.२०) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी, केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत पुरस्कारांची घोषणा होत सर्वेक्षणात नामांकन मिळविलेल्या शहरांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन व्हच्युअल फॉटफॉर्मवर गौरव झाला. 

पुणे : केंद्र सरकारच्यावतीने देशभर राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०२०चा निकाल आज जाहीर करण्यात आला.यामध्ये १ लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकांमध्ये राष्ट्रीय पातळीवर सातार जिल्ह्यातून 'कराड' शहराने प्रथम क्रमांक पटकाविला तर पुणे जिल्ह्यातून 'सासवड'ने द्वितीय क्रमांक तर 'लोणावळा'ने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुरुवारी (ता.२०) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण व नागरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी, केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या उपस्थितीत स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत पुरस्कारांची घोषणा होत सर्वेक्षणात नामांकन मिळविलेल्या शहरांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन व्हच्युअल फॉटफॉर्मवर गौरव झाला. 
 
असे ठरले सासवड स्वच्छ शहर
सासवड नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०२० मध्ये सहभाग घेत असून गेली 3 वर्ष सहभाग घेत आहे.  सन 2018 मध्ये सासवडने राष्ट्रीय स्तरावर अठरावी क्रमांक पटकावून नाविण्य पुर्ण उपक्रमासाठी 5 कोटीचे विशेष पारितोषिक मिळवले होते. सन 2019 मध्ये स्वच्छतेतील सर्वसाधारण प्रकारामध्ये बारावा क्रमांक पटकावला होती.  यंदा 2020मध्ये राष्ट्रीय स्तरावर 1लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. सासवडने हागणदारीदारी मुक्ती ,ODF++ 5 स्टार रँकिंग, नागरिकांचा फिडबॅक आणि प्रत्यक्ष स्वच्छता यामुद्यांवर यश मिळवले आहे. 

'पीएमपी'साठी महापौर मोहोळ घेणार पुढाकार; बससेवा लवकर सुरू होण्याची शक्यता!

 'स्वच्छ सर्वेक्षण २०२०' अंतर्गत सासवडचा सहभाग

 • संपुर्ण शहरात प्रत्येक घरासमोर कचरा जमा करण्यासाठी घंटा गाडी जाते.
 • घंटा गाडीमध्ये ओला सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था केली आहे.
 • सासवडमध्ये  उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण 0 टक्के आहे.
 • सुक्या कचऱ्याची स्क्रॅपमध्ये विल्हेवाट लावली जाते
 • 100 % ओल्या कचऱ्यापासून खत बनिवले जाते
 • सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जाते
 •  उघड्यावर कचरा टाकण्याऱयांवर कारवाई केली जाते.

''सासवड नगरपालिका गेली 'स्वच्छ सर्वेक्षण २०२०' अंतर्गत3 वर्ष काम करीत आहे, मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्र्याने नगरपालिका हद्दीत पायभूत सुविधांसाठी 400 कोटींची तरुतूद केली आहे. त्याचा लाभ कराड, सासवड,लोणावळा आणि 1लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई शहरांना होणार आहे.''
- विनोद जळक, मुख्य अधिकारी,

पुणेकरांच्या विरोधापुढे महापालिका झुकली; 'ते' बहुचर्चित टेंडर केलं रद्द!​
No photo description available.

असे ठरले  लोणवळा स्वच्छ शहर
सलग तिसऱ्यांदा मानांकन प्राप्त करत लोणावळ्याने स्वच्छ सर्वेक्षणात मानाचे स्थान मिळविले आहे. "स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०१९' मध्ये लोणावळा 'कचरामुक्त शहर ठरले असून अभियानात लोणावळ्यास पंचतारांकित मानांकन प्राप्त झाले आहे. लोणावळ्याने सन २०१९ मध्ये दुसरे स्थान तर, सन २०१८ मध्ये ७ वा क्रमांक पटकाविला होता. लोणावळ्याने कचरा मुक्त शहर व सर्वाधिक स्वच्छ व हागणदारी मुक्त शहर असे दोन पुरस्कार लोणावळ्याने पटकाविले आहेत. लोणावळ्याने कचरा मुक्त शहर होण्याचा मानही पटकाविला आहे. सलग तिसऱ्यांदा लोणावळ्याच्या या यशाने नगरपरिषदेवर आनंदाचा वर्षाव होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सन २०१८ मध्ये रु.१० कोटी, सन २०१९ मध्ये १५ कोटी व सन २०२० मध्ये १५ कोटी अशी एकूण ४० कोटी रुपयांचा निधी रक्कम लोणावळा शहरास बक्षीस म्हणून मंजूर झालेली आहे.यापैकी  साडेबारा कोटींचा निधी नगरपरिषदेस प्राप्त झालेली आहे. 

 'स्वच्छ सर्वेक्षण २०२०' अंतर्गत लोणावळ्याचा सहभाग

 • शहरात १६३ कार्यक्रम संपन्न, स्वच्छ मंचवर या कार्यक्रमांची नोंद
 •  शहरातील १८ हजार ३०२ नागरिकांचा सहभाग
 • व्यवसायीकांना स्वच्छतेचे महत्व पटवून शहर प्लॅस्टीक मुक्त  
 • स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्य़ाने स्वच्छता मोहीम, स्वच्छ मॅरेथान 
 • बचतगटांच्या माध्यमातून क्लॉथ बॅक तयार करुन त्यातून कापडी पिशव्या वाटप
 • घरोघरी खत निमिर्तीकरीता मॅजीक बास्केटचे वाटप 
 • १६ शाळांमध्ये सुका कचरा पासबुक योजना सुरु
 • कचऱ्यातून कलाकृती तयार करत चौकांचे सुशोभीकरण 

आणखी वाचा - आजपासून पुण्यातून सुरू झाली एसटी सेवा

''कचऱ्याचे महत्व महिला नागरिकांना समजण्याकरीता कचरा डेपोवर हळदी कुंकु समारंभ पार पडला. यावेळी जवळपास ५ हजार महिलांनी उपस्थिती लावली.लोणावळ्यातील नागरिक, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले सहकार्य यामुळेच हे शक्य झाले असून हा सन्मान त्यांचा आहे. लोणावळ्याचा हा लौकिक कायम ठेवण्याबरोबर लोणावळा शहर हे अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करु''
सुरेखा जाधव , नगराध्यक्षा 

(Edited by: Sharayu Kakade)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Swachh Survekshan 2020 Saswad and Lonavala ranked 2nd and 3rd under less than 1 lakh population