वालचंदनगरच्या महाराज प्रतिष्ठानतर्फे तोरणा किल्यावर स्वच्छता मोहिम

राजकुमार थोरात
बुधवार, 25 एप्रिल 2018

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील महाराज प्रतिष्ठानच्या युवकांनी  तोरणा किल्यावर एकदिवसीय स्वच्छता मोहिम राबवून किल्लावरती कचरा न करण्याचे आवाहन केले. 

वालचंदनगर येथील महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू पवार यांनी वालचंदनगर, रणगाव, कळंब परीसरातील युवकांना एकत्र घेऊन महाराज प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातुन राज्यातील किल्यावर साफसफाई माेहिम राबविण्याचे नियोजन केले अाहे. इंदापूर तालुक्यातील सुमारे २०० युवकांनी एकत्र जावून तोरणा किल्यावर  पडलेल्या पाण्याच्या मोकळ्या  प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, रिकामे ग्लास, पालापाचोळा गोळा केला.

किल्याच्या परीसरामध्ये  अनेक  युवकांनी ठिकाणी दगडी शिळांवर लिहिलेले अवाचनीय संदेश  खोडून  टाकण्याचा उपक्रम राबिवला. किल्यावरील सुका कचरा जाळून टाकला. तर ओला कचरा जमिनीत गाडला. या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, राहुल रणमोडे,अनिकेत रणमोडे,किशोर हगवणे यांच्यासह शेकडाे युवक सहभागी झाले होते. 

किल्ले ,गड महाराष्ट्राची शान...
जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी सांगितले की, राज्यातील किल्ले,गड हे महाराष्ट्राची शान आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी  प्रत्येक किल्यामध्ये अाहेत. महाराज प्रतिष्ठान ने सुरु केलेली किल्यांची स्वच्छा  मोहिम कौतुकास्पद असून जास्तीजास्त युवकांनी यामध्ये सहभागी होवून किल्यांच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न कण्याचे आवाहन करावा. मी ही प्रत्येक मोहिमेमध्ये सहभाग घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: swachhata abhiyan on Fort torna