बारामतीमध्ये स्वच्छता अभियान

मिलिंद संगई
गुरुवार, 12 एप्रिल 2018

बारामती शहर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त आज बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता अभियान राबविले.

या स्वच्छता अभियानाअंतर्गत शहरातील आमराई परिसरासह अनेक ठिकाणी कर्मचा-यांनी स्वच्छता केली. या परिसरात पडलेला कचरा गोळा करुन विविध ठिकाणी कर्मचा-यांनी सफाई केली.

आरोग्य निरिक्षक रवींद्र सोनवणे, सुभाष नारखेडे व राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज आरोग्य विभागाने सकाळपासून हे अभियान मनापासून राबवित हा परिसर चकाचक करुन टाकला. प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून रस्त्यावर पडलेला सगळा राडारोडा गोळा करुन आज या भागाचे रुपच आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी एकत्रित बदलून टाकले.

नगरपालिकेच्या या कर्मचा-यांनी या अभियानामध्ये केलेल्या या कामाबद्दल या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: swachhata campaign in Baramati