विद्यार्थ्यांसह पालकही हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

स्वामी समर्थ विद्यालयातील ५६६ विद्यार्थ्यांना घरी पाठवले
भोसरी - येथील  इंद्रायणीनगरातील अमर ज्योत तरुण मंडळ शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील विनाअनुदानित तुकड्यांतील विनाअनुदानित ५६६ विद्यार्थ्यांना शाळेत न घेता घरी पाठविले. त्याचप्रमाणे अनुदानित  शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शिकवणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. 

स्वामी समर्थ विद्यालयातील ५६६ विद्यार्थ्यांना घरी पाठवले
भोसरी - येथील  इंद्रायणीनगरातील अमर ज्योत तरुण मंडळ शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील विनाअनुदानित तुकड्यांतील विनाअनुदानित ५६६ विद्यार्थ्यांना शाळेत न घेता घरी पाठविले. त्याचप्रमाणे अनुदानित  शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शिकवणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. 

शुक्रवारी  (ता. ६) शाळेत पालक सभेदरम्यान संस्थेतील संबंधितांना मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, यासाठी शिक्षकांनी अशाप्रकारे आंदोलनाचा पवित्रा घेतल्याची माहिती संस्थाचालकांनी दिली.

श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शाळा घेत असलेल्या फीविरोधात पालकांनी आवाज उठविला आहे. यासाठी शुक्रवारी (ता. ६) एका राजकीय पक्षाच्या मध्यस्थीने घेण्यात आलेल्या पालक आणि संस्थाचालक यांच्या सभेत गोंधळ होऊन हाणामारीचा प्रकार घडला. याविषयी भोसरी पोलिस ठाण्यात पक्षाचे पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.  

पोलिसांनी शिक्षकांची तक्रार न घेता विरोधकांना मदत केल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.  संबंधितांना मारहाण करणाऱ्यांना पोलिस जोपर्यंत अटक करत तोपर्यंत शाळेत शिक्षक हाताला काळ्या फीत बांधून विद्यार्थ्यांना न शिकविण्याचे आंदोलन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे विनाअनुदानित विभागातील चार शिक्षकांनी राजीनामे सादर केले आहेत. 

संस्थेने विनाअनुदानित तुकड्यांतील विद्यार्थ्यांना न शिकविण्याचा पवित्रा घेतला असल्याने सोमवारी (ता. ९) शाळेने विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखविला. अशा परिस्थितीमुळे शाळेतील अनुदानित आणि विनाअनुदानित तुकड्यांतील एकूण एक हजार सातशे २२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजकीय वळण
शाळेतील विद्यार्थ्यांच्या फीचा विषय सोडविण्याचे साकडे पालकांनी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांना घातले; तर या वादात मारहाणीविरोधात भाजपने उडी घेतल्याने हा प्रश्न चिघळला आहे. शाळेच्या विषयाला राजकीय रंग प्राप्त झाल्याने हा प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे. 

शुक्रवारच्या मारहाणीच्या घटनेत माझा सहभाग नसतानाही २०१३ पासून संस्थेसंबंधी मिळविलेल्या ‘माहिती अधिकारा’मुळे संस्थाचालक अडचणीत येणार असल्यानेच मला खोट्या गुन्ह्यात गोवले आहे.
- अशोक खर्चे, माहिती अधिकार कार्यकर्ता

भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलो असता, पोलिसांनी तक्रार घेण्यास दिरंगाई तर केली. मात्र शाळेत मारहाण करणाऱ्यांना अद्यापही अटक न झाल्याने पोलिस त्यांना पाठीशी घालत आहेत.
- यशवंत बाबर, संस्थाचालक

Web Title: Swami Samarth Secondary School Issue Student Parent