पुणे : स्वामी समर्थ मंदिरात एका भाविकाला मारहाण; धारदार शस्त्राने केला वार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पुणे : स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद घेण्यासाठी गेलेल्या एका भाविकास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजता एरंडवणे परिसरात घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

प्रवीण विजय सुपेकर (वय 19) व भास्कर रावसाहेब सुपेकर (वय 38, रा.नेहरू वसाहत, कर्वे रस्ता) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्यासह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राकेश गोरखे (वय 31, रा. गणेशनगर, एरंडवणे) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी रात्री नऊ वाजता एरंडवणे येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंनर महाप्रसाद घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी प्रवीण, भास्कर व त्यांच्या साथीदाराने फिर्यादींना शिवीगाळ करत धमकाविण्यास सुरवात केली. त्यानंतर दोघांनी फिर्यादी यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तर एकाने त्याच्याकडील धारदार शस्त्राने फिर्यादीच्या पोटावर व छातीवर वार केले. या घटनेमध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना तत्काळ अटक केली. 
 
Web Title: In Swami Samarth temple Attack on devotee a sharp weapon