बिबवेवाडीत दोन मीटरचा पदपथ राहणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

बिबवेवाडी - बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रस्त्यावर पक्‍क्‍या बांधकामात स्टॉल उभारण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसारच या बाबतचे काम  सुरू आहे. यामध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले  नाही, स्टॉल्सपुढे दीड ते दोन मीटर रुंदीचा पदपथ राहणार आहे, असे स्पष्टीकरण स्थानिक नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी रविवारी केले.  

बिबवेवाडी गावठाणाशेजारील रस्त्याच्याकडेला असलेले पत्र्याचे स्टॉल काढून, पक्‍क्‍या बांधकामात स्टॉल बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. स्टॉलऐवजी त्याजागी मिनी मार्केटमध्ये स्टॉल  बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याला ऑक्‍टोबर २०१५ मध्ये स्थायी समितीने, तर नोव्हेंबर  २०१५ मध्ये सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.  त्यानुसार महापालिकेच्या भवन विभागाने जानेवारीत २४ लाख रुपयांची निविदा काढून काम सुरू केले आहे. त्याला तीन महिन्यांची मुदत आहे. परंतु, काही  घटकांनी हेतुतः तक्रार केल्यामुळे भवन रचना विभागाने २१ मार्चला काम थांबविण्याचे तोंडी आदेश होते. परंतु, त्या बाबत  वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यावर काम सुरू झाले असून, लवकरच ते पूर्ण होईल. स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची असून, त्यानुसारच हे काम सुरू आहे, असेही शिळीमकर यांनी म्हटले आहे. संबंधित स्टॉलधारक अधिकृत असून फेरीवाला धोरणांतर्गत त्यांची नोंदणीही झालेली आहे, असे स्वामी विवेकानंद स्टॉलधारक संघटनेचे अध्यक्ष अशोक बिबवे यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून स्टॉल काढलेले असल्यामुळे संबंधित कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला असून सध्या त्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत असल्याचे मंगल मांडवकर  यांनी सांगितले.

Web Title: Swami Vivekanand road stall issue