हेड टॉर्चच्या प्रकाशात धावत चिंचवडच्या स्वामीनाथनने पूर्ण केली पुणे अल्ट्रा मॅरेथॉन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- 161 किमीची पुणे अल्ट्रा मॅरेथॉन प्रथमच पूर्ण 
- पिंपरी-चिंचवडच्या स्वामीनाथन श्रीनिवासन, भूषण तारक आणि चंद्रकांत पाटील यांची कामगिरी 

पिंपरी : लोणी काळभोर येथे आयोजित 161 किलोटमीटर अंतराची पुणे अल्ट्रा मॅरेथॉन पिंपरी-चिंचवडमधील धावपटू स्वामीनाथन श्रीनिवासन, भूषण तारक आणि चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण रात्रभर धावत 28 तासांत पूर्ण केली. पिंपरी-चिंचवड मधून एवढ्या मोठ्या अंतराची ही शर्यत निर्धारित वेळेआधी पूर्ण करणारे हे पहिलेच धावपटू ठरले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

फ्री-रनर्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे, लोणी काळभोर येथे 50 किमी, 75 किमी, 100 किमी, 161 किमी आणि 100 किमी रिले अशा प्रकारात ही शर्यत भरविण्यात आली. तेथील इनोव्हेरा स्कूलपासून सकाळी 6.15 वाजता 161 किलोमीटर अंतराच्या शर्यतीला सुरुवात झाली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी ती संपली. ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 28 तास 40 मिनिटे इतकी वेळ निर्धारित करण्यात आली होती. परंतु, श्रीनिवासन यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना ही शर्यत 27 तास 26 मिनिटांत पूर्ण केली. तर भूषण तारक आणि चंद्रकांत पाटील यांनी हेच अंतर बरोबरीमध्ये म्हणजे 28 तास 7 मिनिटांत पूर्ण केले.

Video : बैलाला जेसीबीने मारणारे सापडले; दोघांवर गुन्हा दाखल

श्रीनिवासन म्हणाले, "कडक उन्हामुळे 50 किमी, 75 किमी अंतराचे अनेक धावपटू शर्यत सोडून देत होते. त्यामुळे, संयोजकांनी शर्यतीची निर्धारित वेळ वाढविली. संपूर्ण रात्रभर धावताना जीवनातील सर्व भले-बुरे अनुभव डोळ्यासमोरुन गेले. त्याने मन स्वच्छ झाले. दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीमुळे पुढील आयुष्यातील अनुभवांना सामोरे जाण्यासाठी माणूस तयार होतो. शर्यतीचे लूप, दुपारचे-रात्रीचे जेवण काहिसे लवकर पूर्ण केल्याने रात्रीच्यावेळेस अर्धा तास आराम करता आला. 100 किमीनंतर पायाला फोड आले होते.'

बाळासाहेबांचा फोटो शोधताना शिवसेना भवनातील चोरी उघड

तारक म्हणाले,"मागील वर्षी 100 किलोमीटर अंतराची हीच शर्यत मी पूर्ण केली होती. त्याचवेळेस 161 किमी शर्यत देखील पूर्ण करण्याचे ध्येय मनात बाळगले होते. या अगोदर कधी एवढे अंतर धावलो नव्हतो. माझ्यादृष्टीने शर्यत खूप अवघड ठरली. शर्यतीची निर्धारित वेळ आणि प्रत्यक्ष धावल्याची वेळ एकसारखीच ठरली. त्यामुळे, मला रात्री झोपता आले नाही. दुपारचे आणि रात्रीचे जेवणही थोड्या वेळात उरकावे लागले. पावसामुळे रस्ता खूप खराब झाला होता. हेड बॅटरीच्या प्रकाशात रात्रभर पळत राहिलो.'' याखेरीज, 100 किमी अंतराची रिले शर्यत जनार्दन कत्तूल, सुनील पाटील, योगिनी धुमाळ आणि महिंद्र मोहिते यांनी 15 तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swaminathan completed Pune Ultra Marathon by running in the light of head torches