स्वप्नील मालपोटेच्या शिक्षणाची वाट सुकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

टाकवे बुद्रुक - शिक्षणासाठी मदतीची साद घालणाऱ्या स्वप्नील मालपोटेला सामाजिक संस्था, दानशूर आणि गृहिणींनी मदतीची हात दिला आहे. त्यामुळे त्याच्या पुढील शिक्षणाची वाट सुकर झाली आहे. 

‘सकाळ’मध्ये स्वप्नीलला पुढे शिकता येणार? याविषयी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत मदतीचा ओघ सुरू झाला असून, एकाने दुबईहून मदत पाठवली आहे.

वडगाव लायन्स क्‍लबचे अध्यक्ष सुनीत कदम, संस्थापक ॲड. दामोदर भंडारी, अमोल मुथा, जितेंद्र रावळ, भूषण मुथा, आदिनाथ ढमाले यांनी रोख दहा हजार रुपयांची मदत केली. दुबईत नोकरीनिमित्त वास्तव्य करणारे योगेश सरपोतदार यांनी तीन हजार, इन्फोसिसतील महिला कामगार शीतल खांडेकर यांनी दोन हजार, देहूरोडच्या श्रद्धा ठाकूर यांनी दोन हजार, स्वप्नील थोरात यांनी दोन हजार, पिंपरीतील सुनंदा निकरड या गृहिणीने एक हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली. मदतीने स्वप्नीलच्या आजीचे डोळे पाणावले. 

सुनीत कदम म्हणाले, ‘‘या विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंतच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी वडगाव लायन्स क्‍लबने स्वीकारली आहे.’’

इंदोरीतील साई फ्रेंड्‌स क्‍लबचे अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले, ‘‘आमच्या संस्थेच्या वसतिगृहात आतापासून पदवीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी घेण्यास आम्ही इच्छुक आहोत. त्याच्या आजी-आजोबांनी आमच्याकडे त्याला सुपूर्त केल्यास पुढील शिक्षण पूर्ण करू.’’अशीच ग्वाही वडगाव मावळ येथील गोपाळराव देशपांडे वसतिगृहाच्या प्रमुखाने दिली आहे. शीतल खांडेकर, सुनंदा निकरड, श्रद्धा ठाकूर यांनीही दरवर्षी फूल ना फुलाची पाकळी देऊन मदत करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Swapnil Malpote Education