पर्यांयाचा शोध घ्या - प्रा. पळशीकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पुणे - 'पक्षनिधीतील गोपनीयता, पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव आणि जनतेचे लोकप्रतिनिधींवरील नियंत्रण, हे प्रचलित राजकारणातील मुख्य प्रश्‍न आहेत. बिगर राजकीय बाबींकडे वळणे किंवा लोकशाहीविरोधी भूमिका स्वीकारणे याला उपाय नाही, तर पर्यायांचा शोध घेण्याची गरज आहे,'' असे मत ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक प्रा. सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले.

पुणे - 'पक्षनिधीतील गोपनीयता, पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव आणि जनतेचे लोकप्रतिनिधींवरील नियंत्रण, हे प्रचलित राजकारणातील मुख्य प्रश्‍न आहेत. बिगर राजकीय बाबींकडे वळणे किंवा लोकशाहीविरोधी भूमिका स्वीकारणे याला उपाय नाही, तर पर्यायांचा शोध घेण्याची गरज आहे,'' असे मत ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक प्रा. सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले.

सकाळ प्रकाशनच्या "स्वराज्य' पुस्तकाचे प्रकाशन प्रा. पळशीकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी "प्रचलित राजकारण आणि पर्यायी राजकारणाची चिकित्सा' या विषयावर ते बोलत होते. अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे भाषांतर प्रा. साधना कुलकर्णी यांनी केले आहे. "सकाळ'च्या वाचक महोत्सवानिमित्त स. प. महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या "नीतीकुशल' या कार्यक्रमात हे पुस्तक प्रकाशित झाले. प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख सतीश धीवरे, ऐश्‍वर्या कुमठेकर, डॉ. संज्योत आपटे, एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या विभागप्रमुख डॉ. नीता बोकील आदी उपस्थित होते.

प्रा. पळशीकर म्हणाले, 'लोकशाहीच्या क्षितिजापर्यंत पोचण्याची ही वाटचाल सातत्याने सुरू ठेवावी लागणार आहे. प्रस्थापित राजकारणातच बदल करणे व सार्वजनिकतेचा परिसर व्यापक करणे आवश्‍यक आहे. एखाद्या लोकप्रतिनिधींच्या हितसंबंधांचा संघर्ष होत असल्यास धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांना सहभागी होऊ न देणे, लोकप्रतिनिधींचा बडेजाव कमी करण्यासाठी कायद्याचा आधार घेणे, विशिष्ट काळानंतर अभिजनांना व्यवस्थेतून दूर करणे, इत्यादी बदल प्रस्थापित व्यवस्थेमध्ये करणे आवश्‍यक आहे.'' प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, 'स्वराज्य' मध्ये साधी सरळ मांडणी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सहवासातूनच लोकशाहीसाठी आवश्‍यक असणारे सामूहिक नेतृत्व कसे उभे करता येईल, याची मांडणी या पुस्तकात केली आहे.''

स. प. महाविद्यालय - सकाळ प्रकाशनच्या "स्वराज्य' पुस्तकाचे प्रकाशन प्रा. सुहास पळशीकर यांच्या हस्ते झाले. या वेळी (डावीकडून) ऐश्‍वर्या कुमठेकर, डॉ. दिलीप शेठ, प्रा. पळशीकर, प्रा. सतीश धीवरे, प्रा. साधना कुलकर्णी.

Web Title: swaraj book publication