‘स्वरायण’ची रंगतदार मैफल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पुणे - संतूरवादक निनाद दैठणकर यांचा ‘हंसध्वनी’ तसेच गायिका सावनी दातार-कुलकर्णी यांच्या ‘शामकल्याण’मुळे ‘स्वरायण’ संस्थेची मैफल रंगतदार झाली.

युवा कलाकारांना हक्काचे आणि आपले व्यासपीठ मिळावे याकरिता कार्यरत असणाऱ्या ‘स्वरायण’ संस्थेचा या वर्षातील दुसरा कार्यक्रम नुकताच झाला. 
डॉ. धनंजय दैठणकर यांचे शिष्य निनाद दैठणकर यांच्या संतूरवादनाने मैफलीला आरंभ झाला. त्यांनी हंसध्वनी रागाने आपल्या वादनाची सुरवात केली. यामध्ये मध्य लय रूपक, द्रुत एकताल आणि द्रुत तीनतालमध्ये गतवादन सादर केले. निनाद यांना तबल्याची साथ समीर पुणतांबेकर यांनी केली. 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांची नात आणि प्रसिद्ध गायिका शैला दातार यांच्या शिष्या सावनी दातार-कुलकर्णी यांचे गायन झाले. त्यांनी मैफल अधिकाधिक रंगतदार बनवली. सावनी यांनी ‘शामकल्याण’ रागाद्वारे गायनाची सुरवात केली. नंतर याच रागातील एक रचना सादर करून त्यांनी मैफलीचा शेवट ‘भैरवी’ रागातील प्रसिद्ध अभंग ‘अगा वैकुंठीच्या राया’ने केला. त्यांनाही तबला साथ पुणतांबेकर यांचीच होती. संवादिनीची साथ रोहित मराठे यांनी केली. वैदेही आपटे व धनश्री सप्रे यांनी तानपुऱ्याची साथ केली.

Web Title: Swarayan Event

टॅग्स