स्वारगेटचा ग्रेडसेपरेटर ४० दिवस बंद कारण...

जेधे चौक - भुयारी मार्गात खड्डे पडले असून, वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
जेधे चौक - भुयारी मार्गात खड्डे पडले असून, वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

पुणे - स्वारगेटच्या जेधे चौकातील ग्रेडसेपरेटरमध्ये सातत्याने पडणाऱ्या खड्ड्यांचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी त्यात आता सिमेंटचा रस्ता करण्याचा निर्णय महापालिका आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. दीपावलीनंतर त्याचे काम सुरू होणार असून, त्यामुळे सुमारे ४० दिवस हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जेधे चौकात शंकरशेठ रस्ता ते नेहरू स्टेडियम चौक दरम्यान सुमारे सात वर्षांपूर्वी ग्रेडसेपरेटर (भुयारी मार्ग) बांधण्यात आला आहे. त्याचे काम ‘एमएसआरडीसी’ने केले आहे. मात्र, या भुयारी मार्गातील खड्ड्यांचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी महापालिकेचे कार्यकारी अभियंता आय. एन. रणदिवे, उपअभियंता एम. एम. थोपटे तसेच ‘एमएसआरडीसी’चे कार्यकारी अभियंता डी. डी. बारावकर, उपअभियंता डी. डी. कर्जेकर, सल्लागार उदय खैराटकर आणि संबंधित बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधींची २३ ऑक्‍टोबर रोजी बैठक झाली. तीत सध्याचा डांबरी रस्ता खोदून तेथे सिमेंटचा रस्ता करण्याचे ठरले. तसेच, गळक्‍या सांडपाणी वाहिन्याही महापालिका बदलणार असल्याचे निश्‍चित करण्यात आले. दीपावलीनंतर ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक सुमारे ४० दिवस बंद ठेवून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी पोलिसांशी चर्चा करून वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरले. 

वाहनचालक विशाल शिंदे याबाबत म्हणाले, ‘‘या भुयारी मार्गातून मला रोज ये-जा करावी लागते. भुयारी मार्गात प्रवेश केला, की खड्ड्यांमुळे वाहनाचा वेग एकदम कमी करावा लागतो. पावसाळ्यात तर भुयारी मार्गातून गाडी चालविणे धोकादायक वाटते. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती तातडीने केली पाहिजे.’’

‘एमएसआरडीसी’ करणार खर्च 
या भुयारी मार्गाचे काम ‘एमएसआरडीसी’ने सात वर्षांपूर्वी केले आहे. मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आता होणाऱ्या दुरुस्तीचे काम ‘एमएसआरडीसी’च्या कंत्राटदारामार्फत होणार आहे. त्यामुळे महापालिकेचा यावर खर्च होणार नाही. वॉरंटी कालावधीत दुरुस्तीचे काम असल्याने सर्व खर्च संबंधित कंत्राटदार करणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

का करणार आहेत काम?

  • मार्गात सातत्याने खड्डे पडतात 
  • पावसाळ्यात पाणी साचते 
  • सांडपाणी वाहिन्याही गळतात 
  • त्यामुळे नेहमीच पाणी साचते
  • पुरेशी प्रकाशव्यवस्था नाही
  • रात्री वाहने खड्ड्यांत आदळतात

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com