स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाचे काम एलिव्हेटेडच व्यवहार्य - दीक्षित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे - स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्गाचे काम एलिव्हेटेड करणे अधिक व्यवहार्य ठरेल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकारांना सांगितले. 

पुणे - स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्गाचे काम एलिव्हेटेड करणे अधिक व्यवहार्य ठरेल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकारांना सांगितले. 

स्वारगेट ते कात्रज या मेट्रोमार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. हा मार्ग भुयारी असावा, असा आग्रह काही लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. त्याविषयी चर्चा सुरू आहे. याबाबत दीक्षित पत्रकारांना म्हणाले, ‘‘भुयारी मार्गासाठीचा खर्च आणि देखभालीचा खर्च हा जास्त असतो. त्यापेक्षा एलिव्हेटेड मार्ग उभारण्यास येणारा खर्च हा निम्मा असतो. पुण्यातील मेट्रोच्या कामाची प्रगती देशात सर्वोत्तम आहे. मेट्रो ही पुण्याची गरज आहे. यापार्श्‍वभूमीवर नगरसेवकांकडून मार्गांच्या विस्तारीकरणाचे प्रस्ताव येत आहेत. पुण्यात साधारणपणे २०० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तयार होऊ शकतात. ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने केली जाऊ शकतात. सध्या शहराच्या मध्यभागातून मेट्रो मार्ग जात आहे. भविष्यात शहरालगत वर्तुळाकार मेट्रो मार्ग उभा राहू शकतो.’’
बालगंधर्व रंगमंदिराजवळच महामेट्रोतर्फे मेट्रोचे माहिती केंद्र सुरू झाले आहे. त्याची दीक्षित यांनी शनिवारी पाहणी केली. नागरिकांना येथील नोंदवहीत त्यांच्या प्रतिक्रिया, सूचनाही नोंदविता येणार आहेत.

Web Title: Swargate Katraj Metro Route work Brijesh Dixit