Video : उजनी जलाशयात उतरले परदेशी पाहुणे; पाहा कोण कोण आलेय?

समाधान काटे
बुधवार, 8 जानेवारी 2020

पुण्याहून सोलापूरकडे जातांना सुमारे १०० किलोमीटर अंतरावर इंदापूर तालुक्यात भिगवण, कुंभारगांव लागते. येथे हे परदेश पाहूणे जमले आहेत. ऑस्टेलिया, सायबेरिया, युरोप, इजिप्त, जपान, रशिया, अमेरिका, पाकिस्तान, इडोनेशिया, कोलंबिया, मंगोलिया या देशांमधून तसेच भारतामधून राजस्तान, भरतपूर, गुजरात कच्छ, ताल छप्पर, गिर, गुहाघर, चिपळून या ठिकाणाहून २० ते २५ जातीचे पक्षी सध्या जलाशयात उतरले आहेत.

पुणे : जगभरातील अनेक देशांमधून जंगलातील पाणवठ्यावर व माळरानांवर परदेशी पक्ष्यांचे थवे उतरले आहेत. डिसेंबर ते मार्च या दरम्यान त्यांचा मुक्काम उजनी जलाशयावर असतो. यावर्षी देखील विविध आकर्षक पक्षांचे थवे आकाश व्यापत आहे. ते पाहण्यासाठी पक्षी निरिक्षक या भागात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

डेक्‍कन क्‍वीनमध्येच हार्ट अॅटकने प्रवाशाचा मृत्यू 

पुण्याहून सोलापूरकडे जातांना सुमारे १०० किलोमीटर अंतरावर इंदापूर तालुक्यात भिगवण, कुंभारगांव लागते. येथे हे परदेश पाहूणे जमले आहेत. ऑस्टेलिया, सायबेरिया, युरोप, इजिप्त, जपान, रशिया, अमेरिका, पाकिस्तान, इडोनेशिया, कोलंबिया, मंगोलिया या देशांमधून तसेच भारतामधून राजस्तान, भरतपूर, गुजरात कच्छ, ताल छप्पर, गिर, गुहाघर, चिपळून या ठिकाणाहून २० ते २५ जातीचे पक्षी सध्या जलाशयात उतरले आहेत.

दरवर्षी पाणी कमी असल्याने स्थानिक पक्षी व स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये अन्नासाठी स्पर्धा असते. मात्र, या वर्षी पुणे जिल्ह्यात पाऊस भरपूर झाल्यानं धरणाची पाणी पातळी वाढली असून अन्नाचा तुटवडा बिलकूल जाणवत नाही. फ्लेमिंगो (रोहित) पक्षांची संख्या कमी असली तरी इतर पक्षी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत.

परदेशी पाहूण्यांमुळे पर्यटनाला चालना
अन्नाच्या शोधात येणाऱ्या पक्षांमुळे येतील पर्यटनाला चालना मिळाली व स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. या परिसरातील स्थानिक नागरिकांनी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना जलाशयात फिरता यावे व पक्षी निरीक्षणाची संधी मिळावी म्हणून बोटची सोय केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

''पक्षांना पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी नागरिकांनी येथे धूडगूस घालू नये. पक्षांना एकटे सोडावे''
- डॉ. सतिश पांडे, संचालक इला फाऊंडेशन

''पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना आम्ही उजनी जलाशयात होडीने फिरवण्यासाठी घेऊन जातो. कोणते पक्षी कुठून आलेत याची माहिती देतो.त्यामुळे आम्हाला रोजगार उपलब्ध झाला आहे.''
- राहूल काळे, पक्षी प्रेमी

Image may contain: outdoor
फ्लोमिंगो (Flamingo) - फ्लोमिंगो म्हणजेच रोहित पक्षी हे खूप दूरवरून उजनी जलशयात येतात. त्याला अग्नीपंख, पांडव असेही म्हणतात. हे पक्षी सैयबेरियामधून कचमध्ये येतात. वाळूमध्ये पिंडासारखा आकार बनवतात आणि त्यामध्ये अंडी घालतात. एका वर्षात एकाच पिल्लांना जन्म देतात. शेवाळमधील अलगी खाऊन त्यांच्या पंखांना रंग येतो म्हणून त्यांना अग्नीपंख म्हणतात. आकाशात भरारी घेताना इंग्रजीतील 'व्ही' आकार होतो. या पक्षाची उंची ४ फूट आहे. त्यांच्या चोचीत ३ फिल्टर असून अन्न फिल्टर करून खातात. खारं व उथळ पाण्याची त्यांना आवश्यकता असते. येथे येऊन चांगले अन्न खाल्ले तरच ते परत जाऊन प्रजनन करू शकतात या पक्ष्यांची आर्युमान १७ ते १८ वर्ष असते.

Image may contain: bird and text
मार्श हॅरियर(Marsh Harrier) - मार्श हॅरियर म्हणजेच दलदलीत ससाणा. हा
घाटी भागातून येतो. मासे, पक्षांची पिल्ले इतरांचे अन्न हिसकावून खातो. हा पक्षी जमिनीवर बसतो. त्या आर्युमान ७ ते ८ वर्ष असते.

Image may contain: bird and outdoor
नॉर्दन शॉवलर(Northern Shoveler) - नॉर्दन शॉहलर म्हणजेच थापट्या बदक. हा पक्षीगवंड्याच्या थापीसारखा असतो म्हणून त्याला थापट्या बदक असे म्हणतात. हा पक्षी शेवाळ आणि छोट्या गोगलगाय खातो. हे पक्षीथव्याने राहतात. त्यांचे आर्युमान ५ ते ६ वर्ष असते.
 

Image may contain: bird and outdoor
रफ(Ruff) - हा पक्षी आफ्रिकेच्या समुद्रकिनाऱ्यावरून येतो. तिथेच पिल्लांना जन्म देतो.गवताच्या काड्या खातो. गर्भधारणेच्या वेळेस नरड्याला खाली तुरा येतो. दिसायला सर्वात सुंदर असा पक्षी आहे. त्याचे
आर्युमान ४ ते ५ वर्ष असते.
 

Image may contain: bird, outdoor and textराजहंस(Swan) - राजहंस म्हणजेच पट्टकादम.मंगोलिया देशातून हे पक्षी येतात. डोक्यावर तीन बार असतात म्हणून पट्टकादम म्हणतात. हा जगातील सर्वांत उंच उडणारा पक्षी असून हिमालय पार करुन हे पक्षी शेकडोने येतात. हे पक्षी झुंड स्वरुपात राहतात. हे पक्षी लदाखमध्ये पिल्लाना जन्म देतात. त्यांचे आर्युमान १३ ते १४ वर्ष असते.
 

Image may contain: bird and text
रेड मुनिया(Red Munia) - रेड मुनिया म्हणजेच लाल चिमणी. हा पक्षी
दिसायला सुंदर आहे. अन्न गवताच्या काड्या व बीयाखातो. या पक्ष्यांची
वयोमर्यादा दोन ते अडीच वर्ष असते.
 

Image may contain: bird
ओपन बिल(Asian openbill) - ओपन बिल म्हणजेच आडकीत्ता किंवा गोगलफोड्या.
सुपारीसारखी गोगलगाय फोडून खातो म्हणून आडकित्ता असे म्हणतात. हा पक्षी आशिया खंडातून येतो.त्याचे आर्युमान १० ते १२ वर्ष असते.
 

Image may contain: one or more people, bird and text
पेरिग्रीन फाग्लन (Peregrine Faglan) - पेरिग्रीन फाग्लन म्हणजेच भैरी ससाणा. हा पक्षीरशियामधून गुजरातला कचमध्ये येतो त्यांनतर कचमधून भिगवणला येतो. हा पक्षी नागालँन्डमध्ये पिल्लं देतो. जगातील सर्वात जास्त वेगाने उडणारा पक्षी मानला जातो.अन्न पान टिलवा/ढांगाळ्या खातो. शिकार सकाळी नेहमीच्या वेळेत करतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swarm of foreign birds landed in Ujani reservoir