कोजागिरीनिमित्त ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम

Kojagiri
Kojagiri

पुणे - शरद पौर्णिमेच्या (कोजागरी) चांदण्यात रात्र जागवण्याची परंपरा आहे. ही रात्र ‘सुरेल’ व्हावी, यासाठी ‘सकाळ’तर्फे रविवार (ता. १३) ‘स्वरपौर्णिमा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुरमई कार्यक्रमातून शहरवासीयांना सुरेल गाण्यांचा नजराणा मिळणार आहे. 

सायंकाळी ५.३० ते ९ या वेळेत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑफ सोसायटी हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत; तर निर्मिती ‘स्वरसायली’ यांची आहे. या कार्यक्रमाचे पास बुधवारपासून (ता. ९) उपलब्ध होतील. 

‘साजन मोरे घर आयो’ या शास्त्रीय गाण्याबरोबर, ‘तुला पाहिले मी’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारखी भावगीते, तर ‘मला म्हणत्यात हो पुण्याची मैना’, ‘नेहमीच राया तुमची घाई’सारखी ठसकेबाज लावणीगीते सादर केली जातील. नृत्य व गायनाने सजलेला हा कार्यक्रम म्हणजे कोजागरी जागवण्याची सुवर्ण संधीच. 
‘जागर आदिशक्तीचा, उत्सव नवरंगाचा’ या नवरात्र विशेषमधील ‘फोटो ऑफ द डे’च्या विजेत्यांना ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रमात पारितोषिक वितरित करण्यात येणार असून, विजेत्यांनी  अधिक माहितीसाठी संतोष ९८६०३०४०९७ यांच्याशी संपर्क साधावा.

 काय? - ‘स्वरपौर्णिमा’ हा सुरमई कार्यक्रम
 कधी? - रविवार, १३ ऑक्‍टोबर
 केव्हा? - सायंकाळी ५.३० वाजता
 कोठे? - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
 संपर्क - ९५४५९५४७३३ /९८६०३०४०९७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com