श्रोत्यांकडूनही साधना अपेक्षित - प्रभा अत्रे

टिळक स्मारक रंगमंदिर - स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार डॉ. धनंजय दैठणकर यांना रविवारी प्रदान करताना डॉ. अत्रे. उजवीकडे कृ. गो. धर्माधिकारी आणि शारंग नातू.
टिळक स्मारक रंगमंदिर - स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार डॉ. धनंजय दैठणकर यांना रविवारी प्रदान करताना डॉ. अत्रे. उजवीकडे कृ. गो. धर्माधिकारी आणि शारंग नातू.

पुणे - संगीताची भाषा श्रोत्यांना समजणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य ठिकाणी दाद देऊन कलाकारांना प्रोत्साहित करणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे कलाकाराइतकीच साधना श्रोत्यांनी करणे अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.

गानवर्धन संस्था आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्यातर्फे देण्यात येणारा यंदाचा "स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत' पुरस्कार पंडित शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांना डॉ. अत्रे यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला, त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी शारंग नातू, नृत्यांगना स्वाती दैठणकर, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, उपाध्यक्षा नीलिमा राडकर, सहकार्यवाह वासंती ब्रह्मे, विश्वस्त प्राची घोटकर आदी मान्यवर उपस्थित होते. रुपये 50 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या वेळी दैठणकर म्हणाले, 'या पुरस्काराचे यंदाचे दहावे वर्ष आहे आणि पहिल्यांदाच एका वादकाला हा पुरस्कार मिळाला आहे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हा माझ्या वाद्याचा आणि माझ्या गुरूंचा सन्मान आहे.''

या वेळी डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर आधारित संगीत स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. शास्त्रीय संगीत विभागात नैनिका बंदी, उपशास्त्रीय संगीत विभागात रसिका कुलकर्णी-करमाळकर आणि सुगम संगीत विभागात मृदुला तांबे विजेत्या ठरल्या. प्रोत्साहनपर पारितोषिक मोनिका सोनी, सुनीता भट आणि मानसी देसाई यांना देण्यात आले. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून डॉ. राजश्री महाजनी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्माधिकारी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com