Swasthyam 2022 : क्षयरोग निदानासाठी पहिले स्वदेशी ‘किट’

‘मायलॅब’चा आविष्कार : ‘आयसीएमआर’च्या परीक्षणानंतर अधिकृत अनावरण
Swasthyam 2022
Swasthyam 2022sakal

पुणे : पहिले स्वदेशी क्षयरोग (टीबी) निदान किट आणि संयंत्राची निर्मिती ‘मायलॅब सोल्यूशन्स’ने केली असून, भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) परीक्षणानंतर त्याचे अधिकृत अनावरण करण्यात आले आहे. क्षयरोगाबरोबरच निष्‍प्रभ ठरणाऱ्या औषधांचाही ‘पत्ता’ यात कळणार आहे. क्षयरोग निर्मूलनासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला यामुळे मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. एक मोठी प्रयोगशाळा मायलॅबने जणू एका संयंत्रात आणून ठेवली असून, यामुळे निदान पद्धती अधिक सोपी, सहज आणि किफायतशीर होणार आहे.

पॅथोडिटेक्ट एमटीबी आरआयएफ ॲँड आयएनएच ड्रग रेजिस्टन्स किटबरोबरच निदानासाठीचे मायलॅब कॉम्पॅक्ट डिव्हाईस सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल सांगतात, ‘‘एकाचवेळी अनेक समस्यांचे समाधान शोधण्याचे काम आम्ही करत आहोत. निदानाचा वेग वाढविण्याबरोबरच ती अधिक स्वयंचलित आणि एकाचवेळी अनेक चाचण्या करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. देशात आरटी-पीसीआर निदानासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा अभाव बघता, तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि तेवढीच सुलभ असलेले संयंत्र आम्ही बाजारात आणले आहे.’’ ड्रग रेजिस्टन्स अर्थात औषधे निष्प्रभ होण्याचे प्रमाण पाहता क्षयरोगासाठी कोणती औषधे प्रभावी ठरू शकतात, याची चाचणीही या संयंत्राद्वारे केली जाणार आहे.

फायदे काय?

१) स्वयंचलित आणि अचूक निदान पद्धती

२) कमी जागेत, कमी मनुष्यबळात अधिक जलद निदान

३) केवळ दोन तासांत निदान

४) कॉम्पॅक्ट डीएक्समध्ये एकावेळी आठ नमुन्यांचे निदान

संयंत्राची वैशिष्ट्ये

  • क्षयरोगाबरोबरच निष्प्रभ ठरणाऱ्या औषधांचेही निदान

  • पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञान

  • स्वयंचलित पीसीआर सेटअप, एकाचवेळी अनेक चाचण्या

  • सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण आणि नोंदणी

  • निदानातील अचूकता ९५ टक्के

  • ऑनलाइन रिपोर्ट आणि डेटा स्टोअरेज सिस्टिम

क्षयरोगाची स्थिती

२० लाख - दरवर्षी रुग्णांमध्ये होणारी वाढ

२५ टक्के - भारतातील रुग्णांचे प्रमाण

५ ते १८ टक्के - मृत्यूदर

१६ लाख - जगभरातील मृत्यू (सन २०२१)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com