स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनने घेतला गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा वसा

अर्जुन शिंदे
रविवार, 1 जुलै 2018

आळेफाटा : बेल्हे (ता. जुन्नर) येथे आज (ता.1) स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनच्या वतीने स्वामी विवेकानंद दत्तक विद्यार्थी योजनेअंतर्गत श्री बेल्हेश्वर विद्यालय व परिसरातील शाळांमधील एकूण 68 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान गेल्या जवळपास चौदा वर्षांपासून आजपर्यंत तब्बल 769 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. 

बेल्हे येथील स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनच्या वतीने विशेषतः आई - वडील नसलेले विद्यार्थी, एकल पालक असलेले तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आणि मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या पाल्यांची प्राधान्याने निवड करण्यात येते. या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभरासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य, गणवेश, संगणक फी, परीक्षा फी आदी खर्च फाउंडेशनच्या मार्फत केला जातो. तसेच या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. या कार्यक्रम प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गाडेकर व सर्व संचालक मंडळ तसेच जयवंत घोडके, निलेश घोलप, कैलास औटी, जानकू डावखर, गणेश चोरे, उपसरपंच निलेश पिंगट, राजेंद्र गाडगे, मोहन मटाले, निलेश कणसे, गोरक्षनाथ वाघ, नारायण पवार, डॉ. किरण जोशी, शीतल गाडेकर, किशोर अभंग, दीपक पिंगट आदी मान्यवर व सर्व शिक्षक उपस्थित होते.

दरम्यान स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षांपासून सुरु केलेल्या संत तुकाराम वृक्षसंगोपन अभियानात सहभागी होऊन झाडांचे संगोपन करत पर्यावरण संवर्धनात विशेष योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे संचालक व मान्यवरांच्या हस्ते एकूण 121 झाडांच्या रोपांचे शालेय परिसरात तसेच वनविभागाच्या क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Swatantryaveer Yuva Foundation took help from poor students