esakal | इंदापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी स्वाती शेंडे
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी स्वाती शेंडे

सभापती पदासाठी हर्षवर्धन पाटील गटाकडून स्वाती शेंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शितल वणवे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या निवडणुकीत स्वाती शेंडे यांना ८ तर शितल वणवे यांना ५ मते पडली.

इंदापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी स्वाती शेंडे

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी स्वाती बापूराव शेंडे यांची ३ मतांनी निवड झाली. शेंडे या हर्षवर्धन पाटील यांच्या गटाच्या असल्याने या गटाची सत्ता पंचायत समितीवर निर्विवाद राहिली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळत्या सभापती पुष्पा रेडके यांनी नियोजित कालावधी संपण्यापूर्वी एक महिना अगोदर राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सभापती निवडीसाठी बैठक बोलावली होती.

यावेळी सभापती पदासाठी हर्षवर्धन पाटील गटाकडून स्वाती शेंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शितल वणवे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या निवडणुकीत स्वाती शेंडे यांना ८ तर शितल वणवे यांना ५ मते पडली. त्यामुळे स्वाती शेंडे या ३ मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी उपसभापती संजय देहाडे, पुष्पा रेडके, करणसिंह घोलप, देवराज जाधव, सुवर्णा रणवरे, ऍड. हेमंत नरुटे, प्रदिप जगदाळे, प्रदिप काळे, सतीश पांढरे, सारिका लोंढे, शैला फडतरे, रोहिणी घोगरे हेसदस्य उपस्थित होते. नुतन सभापती स्वाती शेंडे व मावळत्या सभापती पुष्पा रेडके यांचा सत्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, ''पुष्पा रेडके यांनी सभापती म्हणून कोरोना महामारी, आरोग्य तसेच शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले आहे. तसेच इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यांचा आदर्श नुतनसभापती स्वाती शेंडे यांनी घेवून पारदर्शी पध्दतीने  तसेच शेतकऱ्यांना दिलासादायक काम करावे.''

(संपादन : सागर डी. शेलार)