पन्नाशीतील तरुणाईचा "एकता सूर' 

Narayangoan
Narayangoan

नारायणगाव (पुणे) : पोहण्याची आवड जोपासणारे ते "पन्नाशीतील तरुण' आज वेगळ्याच उत्साहाने एकत्र आले होते. येडगाव धरण जलाशय ते ओझर देवस्थान जलाशय हे दहा किलोमीटरचे अंतर पोहून जाण्याचा त्यांनी निश्‍चय केला होता. त्यांनी पाण्यामध्ये उडी घेतली आणि दोन तास 50 मिनिटे पाण्यावर सपासप हात मारत त्यांनी हा टप्पा पार केला. त्यांच्या या उत्साहामागे होती, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीची प्रेरणा. प्रत्यक्षात, पंधरा जणांनी धरणाच्या जलाशयात मारलेला हा "एकता सूर' अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. 


जुन्नरमध्ये वयाची पन्नाशी पार केलेल्या सदस्यांचा "पहाटवारा स्वीमिंग ग्रुप' आहे. दहा वर्षांपूर्वी या सर्वांनी येडगाव धरण जलाशय ते ओझर देवस्थान जलाशय या दरम्यानचे दहा किलोमीटरचे अंतर दोन तास पंचेचाळीस मिनिटात पोहून पार केले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून हेच अंतर त्यांनी आता दोन तास पन्नास मिनिटात ते पार केले. त्यानंतर ओझर येथे झालेल्या कार्यक्रमात संबंधितांच्या कुटुंबातील महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. मोहीम यशस्वी केल्याबद्दल डॉ. सदानंद राऊत, डॉ. संदीप डोळे, डॉ. आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 


नारायणगाव येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, डॉ. ओंकार भालेराव, डॉ. वामन घाडगे, सुधाकर लोंढे यांच्या पुढाकारातून राबविलेल्या या उपक्रमात मुख्याध्यापक वाघोले, डॉ. भालेराव, डॉ. घाडगे, लोंढे, व्यापारी दीपक वारुळे, जितेंद्र गुंजाळ, संतोष वाळके, शरद दरेकर, डॉ. मयूर घाडगे, राहुल गरुड, प्रभू पंडित, विजय दरेकर, अप्पा ढवळे, नीलेश कोल्हे आदि सहभागी झाले होते. यासाठी रोटरी क्‍लब नारायणगाव, कुकडी पाटबंधारे विभागाचे के. टी. भोर यांनी सहकार्य केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com