नेहरूनगरमध्ये दोन कोटी पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

पिंपरी - नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर जलतरण तलावाचे सुमारे दोन कोटी 43 लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. परंतु, अवघ्या दीड महिन्यातच पाणी गळती होत असल्यामुळे तो बंद ठेवला आहे. त्यामुळे नागरिक नाराज झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शहर भाजपने केली.

शहरातील सर्वात जुना आणि मोठा अशी तलावाची ओळख तलाव आहे. दीड वर्षापूर्वी पाणीगळतीमुळे महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात 1 कोटी 20 लाख खर्चून "आरसीसी' काम पूर्ण केले. तसेच इतर दुरुस्त्या पूर्ण करून दीड महिन्यापूर्वी तो पालिकेच्या स्थापत्य विभागाकडून क्रीडा विभागाला हस्तांतरित केला होता.

क्रीडा विभागाच्या माहितीनुसार, तलावाच्या तपासणीत पाणीपुरवठा वाहिनीमधून गळती होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे एक नोजल बंद ठेवले आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 3 ते 4 इंच पाण्याची गरज असून पाण्याचे शुद्धीकरण करणेही गरजेचे आहे.

'नेहरूनगर तलावाची करोडो रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली. मग तलाव महिनाभरात का बंद ठेवला आहे, याची चौकशी करून योग्य कारवाई करावी,'' अशी मागणी शहर भाजपचे सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

तलाव "आरसीसी'मध्ये बांधला आहे. त्याचे त्रयस्थ एजन्सीमार्फत परीक्षणही केले आहे. गळती असती तर तलावामधून पाणी झिरपून बाहेर आले असते. मुळातच तेथे पाणीपुरवठा अपुरा असून आणि त्याची शुद्धीकरणाची प्रक्रियाही सदोष आहे.
- स्थापत्य विभाग

तलावामधून गळती होत नाही. रिझर्व्ह टॅंकच्या पुरवठा वाहिनीमधून गळती होत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. लवकरच ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
- योगेश कडुसकर, सहायक आयुक्त (क्रीडा)

2 कोटी 95 लाखांच्या निविदा मंजूर
तलावाच्या नूतनीकरणासाठी आतापर्यंत 2 कोटी 43 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. स्थायी समितीने एकूण 2 कोटी 95 लाख रुपयांच्या निविदा मंजूर केल्या आहेत. संबंधित ठेकेदाराला अंतिम बिल देणे बाकी आहे, असे स्थापत्य विभागाने स्पष्ट केले.

Web Title: swimming tank leakage