स्वाइन फ्लूमुळे चिमुकलीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - स्वाइन फ्लू झालेल्या लहान मुलांच्या औषधांचा राज्यात खडखडाट झाला आहे. लहान मुलांना 30 मिली ग्रॅमच्या गोळ्या पाण्यात विरघळवून द्याव्या लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान, शहरात एक वर्षाच्या मुलीचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेतर्फे कळविण्यात आली आहे. 

राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणारे रुग्णही वाढले आहेत. राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये 157 रुग्णांना स्वाइन फ्लू झाला असून, 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात आतापर्यंत एका लहान मुलाचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

शहरात एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळविली आहे. शहरात जानेवारीपासून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही मुलगी मूळची श्रीरामपूरची (जि. नगर) असून, उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसत असल्याने बुधवारी (ता. 15) तिच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्याचा गुरुवारी (ता. 16) आलेल्या अहवालातून तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. तिचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यूमुळे राज्यात लहान मुलींवरील स्वाइन फ्लूच्या औषधांचा खडखडाट झाल्याची माहिती पुढे आली. 

राज्य सरकारकडील लहान मुलींच्या औषधांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्याचा पुरवठा झाला नसल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली. पुण्यात फेब्रुवारीपर्यंत मुदतबाह्य होणाऱ्या औषधांचा साठा होता. हा साठा कमी असल्याने नागपूरवरून मागविण्यात आलेली औषधेही संपली आहेत. त्यात लहान मुलांची औषधे नव्हती. ही औषधे मिळावी यासाठी सातत्याने मागणी केली. पण, ती मिळाली नाहीत. त्याऐवजी 30 मिली ग्रॅमच्या गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्या पाण्यात विरघळून लहान मुलांना द्याव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

निविदा निघाल्या नाहीत 
लहान मुलांच्या औषध खरेदीच्या निविदा निघाल्या नाहीत. त्यामुळे ही औषध खरेदी झाली नसल्याची माहिती खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. पण, ही औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

"एच1एन1'मध्ये सौम्य बदल 
"एच1एन1' या विषाणूंच्या संसर्गामुळे स्वाइन फ्लू होतो. या विषाणूंमध्ये आता अत्यंत सौम्य स्वरूपाचा बदल झाल्याची माहिती पुढे आली आहे. या बदलाचा अभ्यास करून येत्या मेमध्ये नवीन प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करणार असल्याची माहितीही खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: swine flu death